IND vs AUS Wicket Controversy Umpire Decision: भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील पंचांच्या निर्णयामुळे सध्या गदारोळ झाला आहे. दोन सारख्याच विकेटवर पंचांनी दोन वेगवेगळे निर्णय दिले आहेत. पहिल्या कसोटीत केएल राहुलला पंचांनी ज्या वादग्रस्त पद्धतीने बाद दिले होते. त्या्च्यावरून मोठी चर्चा झाली होती. पण आता दुसऱ्या कसोटीतही सारखीच घटना घडली आहे. पण पंचांनी मिचेल मार्शला नाबाद दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑस्ट्रेलियाच्या डावातील ५८व्या षटकात ही घटना घडली. रविचंद्रन अश्विन मिचेल मार्शला गोलंदाजी करत होता. तिसऱ्या चेंडूवर एलबीडब्ल्यूचे जोरदार अपील होते. ऑनफिल्ड अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ यांनी बाद दिले नाही. भारतीय संघाने यानंतर रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा – Mohammed Siraj Fastest Ball: 181.6 kmph… मोहम्मद सिराजने टाकला क्रिकेटमधील सर्वात वेगवान चेंडू? स्क्रिनवर दाखवण्यात आलेल्या वेगाचं काय आहे सत्य

रिप्लेमध्ये चेंडू बॅटच्या अगदी जवळ असल्याचे दिसून आले. तिसऱ्या पंचांनी फार वेळ न तपासता लगेच निर्णय दिला आणि त्यांनी ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय कायम ठेवला आणि सांगितले की चेंडू पॅडला लागला की बॅटला याचा कोणताही पुरावा नाही. त्यामुळे मैदानावरील पंचांनी आपला नाबाद असल्याचा निर्णय कायम ठेवावा. थोड्याच वेळात दुसरा रिप्ले दाखवला गेला. यामध्ये चेंडू आधी पॅडला लागल्याचे स्पष्ट दिसत होते. असं असताना आता तिसऱ्या पंचांच्या घाईघाईत दिल्या जात असलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभारले जात आहे. केएल राहुलतच्या बाबतीतही सारखीच घटना घडली होती, मग राहुलला कसं काय बाद देण्यात आलं, असा प्रश्न आता चाहते विचारत आहेत.

हेही वाचा – SA vs SL: चेंडूच्या वेगासमोर बॅटचे झाले दोन तुकडे, थोडक्यात वाचला कगिसो रबाडाचा हात; VIDEO होतोय व्हायरल

केएल राहुलला बाद असल्याचा का दिला निर्णय?

पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात केएल राहुलला का बाद घोषित करण्यात आले? तेव्हाही रिप्लेमध्ये चेंडू आधी पॅडला लागला होता की बॅटला लागला होता, हे नीट कळत नव्हते. मैदानावरील पंचांनी तेव्हा त्याला नाबाद दिले होते. तिसऱ्या पंचांनी हा निर्णय बदलत राहुलला बाद घोषित करण्यात आले. पर्थमध्ये रिचर्ड इलिंगवर्थ हे पंच होते. त्यांना कॅटलबरो यांनी निर्णय बदलायला लावला होता. रिचर्ड इलिंगवर्थ या सामन्यात मैदानावरील पंच आहेत. त्याचा निर्णय थर्ड अंपायर रिचर्ड कॅटलबरो यांनी रद्द केला नाही.

हेही वाचा – Gus Atkinson Hattrick: कसोटी हॅटट्रिक! गस अ‍ॅटकिन्सनने वेलिंग्टनमध्ये घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला गोलंदाज

मिचेल मार्श डाऊन द ट्रॅक आला आणि चेंडू आधी पॅडला लागला. थर्ड अंपायरने स्निकोची मदत घेतली. यानंतर त्याला नाबाद देण्यात आले. यानंतर ब्रॉडकास्टरने झूम आउट व्हर्जन दाखवले. चेंडू आधी पॅडला लागल्याचे दाखवले. समालोचकांनीही बॉल-ट्रॅकिंग न दाखवल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus controversial umpiring over r ashwin lbw appeal as mitchell marsh given out kl rahul drs bdg