Cricket Australia breaks silence on not inviting Gavaskar for trophy presentation: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला रविवारी पूर्णविराम लागला. ऑस्ट्रेलियाने एका दशकाच्या प्रतिक्षेनंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकली. मालिका संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ विजयाच्या जल्लोषात इतका मग्न झाला की त्यांनी महान भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचा अपमान केला. याबाबत आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वक्तव्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारताविरुद्ध पाच सामन्यांची मालिका जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सादर करण्यासाठी गावस्कर यांना निमंत्रित केले नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केवळ एलन बॉर्डर यांच्या हस्ते ही ट्रॉफी विजयी संघाला प्रदान केली. भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला दोन्ही संघांच्या या दिग्गज खेळाडूंच्या नावावरून बॉर्डर गावस्कर ट्रॉफी हे नाव देण्यात आले. त्यामुळे दोन्ही खेळाडूंच्या हस्ते ट्रॉफी देण स्वाभाविक गोष्ट होती. पण क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तसं केलं नाही.

हेही वाचा – IND vs AUS: सुनील गावस्करांचा ऑस्ट्रेलियात अपमान? नाराजी व्यक्त करत म्हणाले, “मी भारतीय आहे म्हणून…”

सुनील गावस्कर हे भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील प्रत्येक सामन्यासाठी ऑस्ट्रेलियात उपस्थित होते. सिडनीच्या मैदानावरही प्रेझेंटेशनदरम्यान सुनील गावस्कर हे मैदानावर सीमारेषेबाहेर उभे राहून ऑस्ट्रेलियन संघाला टाळ्या वाजवत अभिनंदन करताना दिसले.

स्टार स्पोर्टशी बोलताना गावस्करांनी याबाबत नाराजी दर्शवताना म्हणाले, “मला तिथे ट्रॉफीच्या सादरीकरणासाठी स्टेजवर उपस्थित राहण्यासाठी नक्कीच आवडले असते. अखेर ही बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आहे आणि ती ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात खेळवली जाते. म्हणजे, मी इथे मैदानावर उपस्थित आहे. सादरीकरणाच्या बाबतीत, ऑस्ट्रेलिया जिंकला याने मला काही फरक पडत नाही. ते चांगले क्रिकेट खेळले आणि त्यामुळे ते जिंकले आहेत. ठीक आहे, फक्त मी भारतीय आहे म्हणून मी सादरीकरणामध्ये ट्रॉफी देऊ शकलो नाही. माझा मित्र एलन बॉर्डरसह ट्रॉफी सादर करताना मला आनंद झाला असता.”

हेही वाचा – IND vs AUS: “आम्ही कोण? आम्हाला क्रिकेट थोडंच येतं…”, सुनील गावस्कर भारताच्या मालिका पराभवानंतर रोहित शर्मावर संतापले?

मात्र आता गावस्करांना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्रॉफी सादरीकरणासाठी बोलावले नसल्याची सगळीकडे चर्चा सुरू आहे. यादरम्यान आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वक्तव्य केले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले की, एलन बॉर्डर आणि सुनील गावस्कर या दोघांनाही ट्रॉफी देण्यासाठी स्टेजवर आमंत्रित करायला हवे होते. क्रिकेट ऑस्ट्रेलिया म्हणाले की, “आम्ही मान्य करतो की एलन बॉर्डर आणि सुनील गावस्कर या दोघांना एकत्र स्टेजवर येण्यासाठी आमंत्रित केले असते, तर अधिक योग्य ठरलं असतं.”

हेही वाचा –Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलला नशेत चालताही येईना, घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ‘तो’ Video व्हायरल, मद्यधुंद अवस्थेत…; नेमकं काय घडलेलं?

क्रिकेट ऑस्ट्रेलियाची योजना गावस्कर किंवा बॉर्डर या दोघांना पुरस्कार सोहळ्यासाठी आमंत्रित करण्याची होती, ज्यात या दोघांपैकी कोणता खेळाडू ट्रॉफी प्रदान करणार हे मालिका विजेत्यावर अवलंबून होते. या प्रकरणाची माहिती देताना एका सीए अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांची योजना अशी होती की जर भारताने मालिका जिंकली तर सुनील गावस्कर त्यांच्या संघाला ट्रॉफी सादर करतील, तर कांगारू संघाने मालिका जिंकली तर एलन बॉर्डर ट्रॉफी सादर करतील.