भारताने ऑस्ट्रेलियाच्या संघावर एकदिवसीय मालिकेतील निर्णायक सामन्यात मात केली. हा सामना भारताने ७ गडी राखून जिंकला. कर्णधार विराट कोहली माघारी परतल्यानंतर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने जबाबदारीने खेळ केला. त्याने धावगतीचा अंदाज बांधत भारताला विजय मिळवून दिला. धोनीने मेलबर्नवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतकी खेळी करताना तिसऱ्यांदा एक पराक्रम केला.

एक विक्रम नावावर केला. त्याचे हे ऑस्ट्रेलियातील सलग तिसरे अर्धशतक ठरले. या कामगिरीसह धोनीने वन-डे सामन्यात सलग तीन अर्धशतक करण्याचा पराक्रम तिसऱ्यांदा नावावर केला. मालिकेतील पहिल्या सामन्यात धोनीने ५१ धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात त्याने नाबाद ५५ धावा ठोकल्या. तर तिसऱ्या सामन्यात त्याने शानदार नाबाद ८७ धावांची खेळी केली. हा पराक्रम करत त्याने एकाच एकदिवसीय मालिकेत ३ अर्धशतके करण्याचा पराक्रम तिसऱ्यांदा केला. या आधी त्याने २०११ मध्ये इंग्लंड दौऱ्यात आणि २०१४ मध्ये न्यूझीलंड दौऱ्यात यजमानांविरुद्ध अशी कामगिरी केली होती. तशीच कामगिरी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धही केली.

दरम्यान, या मालिकेसाठी धोनीला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.

Story img Loader