Rohit Sharma Viral Video Fans Chant Mumbai cha Raja Rohit Sharma: भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे सामने खेळत आहे. भारताने पहिला कसोटी सामना तब्बल २९५ धावांनी जिंकत ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. ऑस्ट्रेलियाच्या पर्थमधील बालेकिल्ल्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत इतिहास रचला. भारतीय संघाचा नियमित कर्णधार या सामन्यात उपस्थित नव्हता. त्यामुळे भारतीय संघ पहिला कसोटी सामना जसप्रीत बुमराहच्या नेतृत्त्वाखाली खेळला आणि विजयही मिळवला. भारतीय संघ आता दुसऱ्या कसोटीपूर्वी सराव सामना खेळण्यासाठी कॅनबेरा येथे आहे, यादरम्यानचा रोहित शर्माचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित शर्मा १५ नोव्हेंबर रोजी दुसऱ्यांदा बाबा झाला. त्यामुळे आपल्या दुसऱ्या मुलाचा जन्मानंतर रोहित शर्मा कुटुंबाबरोबर वेळ घालवण्यासाठी मुंबईतच राहिला. त्यामुळे पहिला कसोटी सामना खेळू शकला नाही. पहिल्या कसोटीच्या सामन्याच्या चौथ्या दिवशी रोहित शर्मा पर्थमध्ये दाखल झाला. भारताचा सामना सुरू असताना रोहित शर्मा ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित होता. भारतानो चौथ्या दिवशी सामना जिंकल्यानंतर रोहितने संघाचे कौतुकही केले. तर पर्थच्या मैदानावर रोहित शर्मा सराव करतानाही दिसला होता.

हेही वाचा – IND vs PAK: आज होणारा भारत-पाकिस्तान मुकाबला कुठे लाईव्ह पाहता येणार? जाणून घ्या वेळ आणि चॅनेल

भारतीय संघ पर्थ कसोटीनंतर दोन दिवसीय गुलाबी चेंडूचा सराव सामना खेळण्यासाठी कॅनबेरामध्ये दाखल झाला. भारतीय संघ ऑस्ट्रेलियातील प्राईम मिनिस्टर इलेव्हन संघाविरूद्ध गुलाबी चेंडूचा सामना खेळणार आहे. हा सामना आज ३० नोव्हेंबर रोजी सुरू होणार होता पण पाऊस पडल्याने सामना मात्र सुरू झालेला नाही. यापूर्वी भारतीय संघ कॅनबेरामध्ये पोहोचला तेव्हाचा रोहित शर्माचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

हेही वाचा – पिंक बॉल टेस्टसाठी ऑस्ट्रेलियाने दिली दोन भेदक गोलंदाजांना संधी; टीम इंडियासमोर नवं आव्हान

रोहित शर्मा भारतीय संघाच्या टीम बसमध्ये बसलेला दिसत आहे. तर टीम बसच्या बाहेर भारतीय संघाचे चाहते गोळा झाले आहेत आणि ते बाहेरूनच मुंबईचा राजा रोहित शर्मा, मुंबईचा राजा रोहित शर्मा असे नारे देताना दिसत आहे. तर रोहित शर्मा चाहत्यांचे नारे ऐकून थोडासा बुजल्यासारखा होत, मान खाली घालतो आणि मग अंगठा दाखवून चाहत्यांना प्रतिक्रिया देतो. कॅनबेरामधील हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा – IND vs AUS: ऑस्ट्रेलियाला सर्वात मोठा धक्का, ‘हा’ मुख्य खेळाडू दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर; बदली खेळाडूची घोषणा

भारत ऑस्ट्रेलियामधील दुसरा कसोटी सामना अ‍ॅडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. हा गुलाबी चेंडूचा सामना असून रात्र दिवस कसोटी सामना असणार आहे. या सामन्यापूर्वी शुबमन गिल पुन्हा फिट होऊन भारतीय संघात परतण्याची चिन्हे आहेत. तर ऑस्ट्रेलिया संघाला जोश हेझलवूडच्या रूपात मोठा धक्का बसला आहे. दुसऱ्या कसोटीतून हेझलवूड दुखापतीमुळे बाहेर झाला आहे, त्याच्या जागी सीन अ‍ॅबॉट आणि ब्रेंडन डॉगेट यांना संघात सामील केलं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus fans chant mumbai cha raja rohit sharma ahead of india practice match video goes viral see captain reaction bdg