अवघ्या क्रिकेट विश्वाला सध्या उत्कंठा लागली आहे ती विश्वचषक २०२३च्या अंतिम सामन्याची! गेल्या दीड महिन्यापासून जगभरातील क्रिकेट खेळणारे देश भारतात वेगवेगळ्या मैदानांवर एकमेकांसमोर उभे ठाकले. काही सामने जिंकले, काही हरले. अखेर या सर्व देशांमधून भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन देश अंतिम सामन्यापर्यंत पोहोचले असून रविवारी १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर त्यांच्यात विश्वचषकाच्या विजेतेपदासाठी सामना होणार आहे. त्यामुळे अर्थात दोन्ही बाजू आपली सर्व शक्ती पणाला लावून हा विश्वचषक आपल्या नावावर करण्यासाठी उत्सुक आणि सज्ज असतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकीकडे भारतीय संघाच्या जमेच्या बाजूंची चर्चा होत असताना दुसरीकडे ऑस्ट्रेलियाही पाच वेळा जगज्जेतेपदावर नाव कोरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला कमी लेखण्याची चूक भारताचे धुरंधर अजिबात करणार नाहीत. विश्वचषकात ८ सामन्यांत विजय मिळत अंतिम फेरीत पोहोचलेल्या ऑस्ट्रेलियानंही भारताचा सामना करण्याची पूर्ण तयारी केली आहे. यासंदर्भात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पॅट कमिन्सला विचारणा करण्यात आली असता त्यानं अंतिम फेरीत भारताचा सामना कसा करणार? यावर उत्तर दिलं.

खेळपट्टी चर्चेत, पॅट कमिन्स म्हणतो…

यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघाच्या धडाकेबाज कामगिरीप्रमाणेच खेळपट्टी हा एक चर्चेचा विषय ठरला आहे. काही संघांनी खेळपट्टी व्यवस्थित न मिळाल्याची तक्रार केली. पाकिस्तान संघ व्यवस्थापनानंही विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर खेळपट्टी व्यवस्थित नसल्याचा दावा केला होता. भारत विरुद्ध न्यूझीलंड उपांत्यफेरी सामन्यात नवीन खेळपट्टी न वापरता जुनीच खेळपट्टी वापरल्याचा दावा खुद्द आयसीसीच्या पीच सल्लागारानं केल्यानंतर खेळपट्टीचा मुद्दा चर्चेत आला. मात्र, पॅट कमिन्सला याची अजिबात चिंता वाटत नाही.

अहमदाबादची खेळपट्टी भारतीय संघाला मदत देणारी ठरेल असं वाटतं का? असा प्रश्न विचारला असता पॅट कमिन्स म्हणाला, “खेळपट्टी दोन्ही संघांसाठी सारखीच असते. आपल्या देशात आपण आधी खेळलेल्या खेळपट्टीचा आपल्याला थोडाफार फायदा होतो हे मान्यच आहे. पण आम्ही भारतातल्या खेळपट्ट्यांवर खूप क्रिकेट खेळलेलो आहोत”.

Ind vs Aus Final: विजयासाठी किती धावा ठरणार पुरेशा? आकडा आला समोर; पीच क्युरेटरनं व्यक्त केला अंदाज!

“नाणेफेक महत्त्वाची नाही”

दरम्यान, अंतिम सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा नसेल, असं पॅट कमिन्सचं मत आहे. “मला वाटतं भारतातल्या इतर सर्व मैदानांचा विचार केला, तर अहमदाबादच्या मैदानावर नाणेफेकीचा कौल कुणाच्या बाजूने जातो, याला फारसं महत्त्व नसेल. तसं ते मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर किंवा इतर कुठल्या स्टेडियमवर असतंच. पण इथे त्याचा फारसा परिणाम होणार नाही. त्यामुळे त्यांच्या (भारत) कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज असू. आम्ही नक्कीच काहीतरी नियोजन करूनच उद्याच्या सामन्यात उतरू”, असं पॅट कमिन्स यावेळी म्हणाला.

Ind vs Aus Final: ऑस्ट्रेलिया २ बाद ४५०! मार्शच्या भाकितावर तुफान मीम्स व्हायरल; म्हणे, “यांना महाराज, शम्सी आवरेनात आणि…!”

भारत-पाकिस्तान सामन्याचीच खेळपट्टी!

दरम्यान, इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात गेल्या महिन्यात भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना खेळवण्यात आलेलीच खेळपट्टी असणार आहे. खेळपट्टीचा आढावा घेतल्यानंतर पॅट कमिन्सला विचारणा केली असता तो म्हणाला, “मी काही खेळपट्टीचा उत्तम जाणकार वगैरे नाही. पण मला वाटतं ही खूप चांगली खेळपट्टी आहे. त्यांनी त्या खेळपट्टीवर फक्त पाणी फवारलं आहे. २४ तास जाऊ द्या. उद्या बघा. पण माझ्यामते ही एक चांगली खेळपट्टी आहे”.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus final at ahmedabad narendra modi stadium pat commins on pitch reports pmw
Show comments