अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेट विश्वचषक २०२३ चा फायनल सामना खेळावला जात आहे. हा सामना पाहण्यासाठी देशातील कानाकोऱ्यातून क्रिकेटप्रेमी स्टेडियमवर दाखल झाले आहेत. प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या या स्टेडियममध्ये रविवारी एक वेगळं चित्र पाहायला मिळालं.

रविवारी अहमदाबादमध्ये चालू असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया फायनल सामन्यादरम्यान ‘फ्री पॅलेस्टाईन’ असा संदेश लिहिलेला टी-शर्ट घातलेल्या एका पॅलिस्टिनी समर्थक तरुणाने खेळपट्टीकडे धाव घेतली आणि विराट कोहलीला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. त्याने अंगात लाल रंगाची चड्डी (शॉर्ट) आणि पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला होता. टी-शर्टवर समोरच्या बाजूला ‘पॅलेस्टाईनवर बॉम्ब टाकणं बंद करा’ आणि मागच्या बाजूला ‘फ्री पॅलेस्टाईन’ असा संदेश लिहिला होता.

IND vs AUS virat Kohli Is Emotional Said Glenn MacGrath Urges Australia to Go Hard on Him in Border Gavaskar Trophy
IND vs AUS: “विराट कोहली भावनिक आहे, त्याचा फायदा…”, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने कांगारू संघाला दिला मोलाचा सल्ला
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Suryakumar Yadav won the hearts of fans video viral
Suryakumar Yadav : याला म्हणतात देशभक्ती… देशाचा अपमान होताना पाहून सूर्यकुमार यादवने केलं असं काही की, तुम्हीही कराल सलाम, पाहा VIDEO
rohit sharma ritika sajdeh blessed with a baby boy Posts Goes Viral on Social Media
Rohit Sharma Blessed with Boy: ज्युनियर हिटमॅन, रोहित शर्माला मुलगा झाला? सोशल मीडियावर चर्चांना उधाण; पोस्टचा महापूर
KL Rahul Injured in Intra Squad Match Simulation Session Perth Walks Off Field for Scanning Ahead Border Gavaskar Trophy IND vs AUS
IND vs AUS: भारताला पर्थ कसोटीपूर्वी मोठा धक्का, केएल राहुलला सराव सामन्यात दुखापत, सोडावं लागलं मैदान!
IND vs AUS Tim Paine impressed with Dhruv Jurel
IND vs AUS : ‘तो फक्त २३ वर्षांचा आहे, पण…’, टिम पेन भारताच्या युवा खेळाडूच्या फलंदाजीने प्रभावित; म्हणाला, ‘तो ऑस्ट्रेलियन चाहत्यांना…’
Sule indirectly attacked Ajit Pawar and his supporters during speech
“आजकाल भाषण करतांना काळजी घ्यावी लागते” सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

या प्रकारानंतर सुरक्षेचा भंग केल्याप्रकरणी संबंधित तरुणाला तातडीने सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतलं. अहमदाबादच्या स्टेडियममध्ये आज एक लाख ३० हजार प्रेक्षक उपस्थित आहेत. विश्वचषक २०२३चा फायनल सामना असल्याने स्टेडियममध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. मात्र, पॅलेस्टिनी समर्थकाने सर्व सुरक्षा रक्षकांना चकवा देत चालू सामन्यादरम्यान मैदानात प्रवेश केला.ही घटना भारतीय डावाच्या १४व्या षटकात घडली. ऑस्ट्रेलियन गोलंदाज अ‍ॅडम झाम्पा गोलंदाजी करत होता. तर विराट कोहली आणि लोकेश राहुल खेळपट्टीवर होते.

हेही वाचा- “मोदी होते म्हणून गुगली पडली, मोदींनीच…”; क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यावर बोलताना संजय राऊतांची टोलेबाजी

विशेष म्हणजे, गेल्या जवळपास ४४ दिवसांपासून इस्रायल आणि हमास संघटनेत युद्ध सुरू आहे. ७ ऑक्टोबर रोजी पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर रॉकेट हल्ला केल्यानंतर या युद्धाला सुरुवात झाली. यानंतर इस्रायलकडून सातत्याने पॅलेस्टाईनवर बॉम्ब हल्ले केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर पॅलेस्टाईनवरील बॉम्ब हल्ले थांबवावे, असा संदेश देण्यासाठी संबंधित तरुणाने स्टेडियममध्ये धाव घेतली होती.