IND vs AUS: ऑस्ट्रेलिया संघाला भारताविरुद्धच्या सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला होता. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियन संघाला ६ विकेट्सच्या अंतराने पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज आणि संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याने संघाच्या दोन चुका दाखवून दिल्या, ज्यामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

दिल्लीतील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्याबद्दल रमीझ राजाने टीम इंडियाचे कौतुक केले आहे. माजी खेळाडूने सांगितले की तीन दिवसात भारताच्या विजयाने ऑस्ट्रेलिया  उपखंडातील संघांना त्यांच्या घरी पराभूत केल्याची आठवण करून दिली. राजा म्हणाले की, “नुकत्याच संपलेल्या सामन्यात फिरकीपटूंविरुद्ध १६ विकेट्स गमावल्यापासून ऑस्ट्रेलियन फलंदाज तांत्रिकदृष्ट्या कशा चुकीच्या पद्धतीने बाद झाले यावर संघ व्यवस्थापनाने विचार करणे गरजेचे आहे. अशी फलंदाजी स्पिनर्सविरुद्ध पाहून मी चक्रावून गेलो हे फार भयंकर आहे. लवकरच यात सुधारणा करणे आवश्यक आहे.”

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा: IND vs AUS: ऑस्ट्रेलियन संघामागील शुक्लकाष्ट काही संपेना; ५ खेळाडू भारत सोडणार, २ परतणार नाहीत, एकाचे करिअर धोक्यात!

रमीझ राजांची ऑस्ट्रेलियन संघावर सडकून टीका

रमीझ राजा म्हणाले, “ऑस्ट्रेलिया स्वतःच्या कृतीचे फळ भोगत आहे. ते पर्थ किंवा ब्रिस्बेनमधील आशियाई संघांना तीन दिवसांत हरवून खेळ संपवायचे. भारतात चांगले क्रिकेट खेळण्याचा प्रश्न येतो तेव्हा ऑस्ट्रेलियन खेळाडू तयार नसतात. तुमच्या देशात म्हणजेच इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीजमध्ये जसे आशियाई संघांना वागवतात तसेच त्यांची अवस्था इथे होते. मी खेळपट्ट्यांबाबत बोलत आहे.”

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष भारताचे कौतुक करताना म्हणाले की, “अक्षर पटेलने अश्विनसोबत केलेली ११५ धावांची भागीदारी केली हा खेळाचा टर्निंग पॉइंट होता. अक्षर पटेलने ७० धावा केल्या आणि रविचंद्रन अश्विनसोबत सामना जिंकण्याची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियन खेळाडू अप्रस्तुत होते आणि फिरकीपटूंविरुद्ध त्यांची कामगिरी खराब होती.” राजा पुढे म्हणाले की, “पाकिस्तानच्या विपरीत, भारताने केवळ खेळण्याची परिस्थितीच योग्य ठेवली नाही तर खेळातील त्यांच्या रणनीतींनाही पाठिंबा दिला.”

हेही वाचा: INDW vs IREW T20 WC: भारतासाठी आजचा सामना ‘करो या मरो’! उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी आयर्लंडवर विजय आवश्यक, जाणून घ्या प्लेईंग-११

रमीझ पुढे म्हणाले, “भारताला फिरकीच्या खेळपट्ट्यांवर हरवणे जवळजवळ अशक्य आहे. बीसीसीआयची रणनीती खूप यशस्वी झाली आहे. पाकिस्ताननेही फिरकीचे ट्रॅक तयार करून प्रतिस्पर्ध्याला हरवण्याचा प्रयत्न केला, मात्र तसे झाले नाही. भारताला केवळ परिस्थितीची साथ मिळाली नाही तर त्यांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजी आक्रमणाचा धुव्वा उडवत स्वतःच्या गोलंदाजांवरील प्रतिभेवरही भरवसा ठेवला.”

Story img Loader