भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. रविवारी (१९ फेब्रुवारी) म्हणजेच दिल्ली कसोटीच्या तिसऱ्या दिवसी सामन्याच्या निकाल लागला. भारताने हा सामना ६ विकेट्स राखून नावावर केला. जडेजाने तिसऱ्या दिवसी एकून सहा विकेट्स घेतल्या आणि पाहुण्या ऑस्ट्रेलियाला स्वस्तात बाद केले. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या ११८ धावांवर गुंडाळला गेला. प्रत्युत्तरात भारताने चार विकेट्सच्या नुकसानावर हे लक्ष्य गाठले. सामन्यानंतर राहुल द्रविडने कोहलीच्या छोले-भटूरे मागील रहस्य उघड केले आहे.
भारतीय संघाचा सुपरस्टार फलंदाज विराट कोहली आऊट झाल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये बसून प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी बोलत होता. तेव्हाच एका व्यक्तीने कोहलीसाठी छोले-भटूरे आणले. जेवण पाहून कोहलीचा मूड बदलला आणि त्याने त्या माणसाला मी लगेच येतो असा इशारा केला. त्याचवेळी त्याने प्रशिक्षक राहुल द्रविड यांना देखील खाण्याची विनंती केली आणि द्रविडला हसू अनावर झाले. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्याला चाहत्यांनी पसंती दिली आहे.
कोहलीच्या छोले-भटूरे मागील रहस्य केले उघड
दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत होता, ज्यामध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीला एका स्टाफने जेवण आणले होते, त्यानंतर कोहलीचा आनंद पाहण्यासारखा होता. त्याचवेळी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडलाही हसू आवरता आले नाही. त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. कोहलीला खूप आवडत असल्याने तो छोले भटुरे असू शकतो असा अंदाज चाहत्यांनी बांधला होता.
विशेषतः दिल्लीत हे खूप फेमस आहेत. आता या व्हिडिओ मागील खुलासा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी केला आहे. दिल्ली कसोटी संपल्यानंतर द्रविड म्हणाला, “ते छोले भटुरे नव्हते, तर छोले कुलचे होते.” ज्यावेळी त्याला कोहलीने विनंती केली की तुम्हीपण खा तर त्याने हात जोडले आणि म्हणाला की, “मी ५० वर्षांचा आहे, मी आता इतके कोलेस्ट्रॉल हाताळू शकत नाही.एका मुलाखतीदरम्यान विराट कोहलीने कबूल केले आहे की दिल्लीच्या राजौरी गार्डनचे चोले भटुरे हे त्याचे आवडते आहेत.”
विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा झाला यष्टीचीत
११५ धावांचे छोटे लक्ष्य गाठण्यासाठी कोहलीला वेगवान खेळायचे होते. त्यामुळे दोन शानदार फटकेही मारले होते. १९व्या षटकातही तो असाच शानदार फटकेबाजी करत पुढे जाणार होता. त्यासाठी तो चार पावले पुढेही गेला. पण मर्फीने त्याची चाल ओळखून चेंडू त्याच्यापासून दूर फेकला. यानंतर कोहली खेळपट्टीच्या मधोमध अडकला आणि यष्टिरक्षकाने त्याला यष्टिचित केले. यासह कोहलीचा डाव २० धावांवर संपला. १८० डावानंतर तो पहिल्यांदा यष्टिचीत झाला.