भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ४ सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूर येथे खेळला गेला. दमदार सांघिक कामगिरीच्या जोरावर यजमान भारतीय संघाने अडीच दिवसातच हा सामना खिशात घातला. ‌या सामन्यात भारताने एक डाव आणि १३२ धावांनी दणदणीत विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारतीय क्रिकेटपटूंनी या संपूर्ण सामन्यात जबरदस्त कामगिरी करून दाखवली. त्यानंतर या विजयात सर्वात मोठे योगदान दिलेल्या अष्टपैलू रवींद्र जडेजा याने ऑस्ट्रेलियन संघाची खिल्ली उडवली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू हा चेष्टेचा विषय झाला आहे आणि का नाही व्हावा चेष्टा मस्करीचा विषय…ज्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज एकामागून एक बाद होत होते. त्यावर भारतीय फलंदाजांनी धावांची इमारत बांधली. पण, कांगारूंची खरी गंमत तेव्हा झाली जेव्हा भारतीय खेळाडूंनी खेळपट्टीवर त्यांच्या वर्तनाचा समाचार घेतला. नागपूर कसोटीनंतर रवींद्र जडेजा ऑस्ट्रेलियाकडून चिमटा काढणाऱ्या खेळाडूंमध्ये आघाडीवर होता. त्याच्यासोबत अक्षर पटेलनेही खेळपट्टीच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाच्या कृतीवर आपली प्रतिक्रिया दिली.

“ते विमानात बसले तेव्हाच घाबरले”- रवींद्र जडेजा

सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्स या प्रक्षेपण वाहिनीशी झालेल्या संवादात जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या मानसिकतेवर भाष्य केले. त्यांचे विधान अतिशय खुमासदार आणि चटपटीत होते. जडेजाच्या मते, ऑस्ट्रेलियन संघातील खेळपट्टीची भीती भारताने आधीच घरी आणली होती. नागपूर कसोटीत एकूण ७ विकेट्स घेणारा जडेजा म्हणाला, “ऑस्ट्रेलियन संघाचे खेळाडू विमानात बसण्यापूर्वीच घाबरले असावेत. त्याने आपल्या घरातून खेळपट्टीबद्दल भीती आणली, ज्याचा फटका त्यांना सहन करावा लागला. जडेजाच्या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणही सहमत होताना दिसला की, खेळपट्टीत तिसर्‍या दिवशी वळण तेवढे नव्हते, तरीही ऑस्ट्रेलियाला खेळण्यास त्रास झाला.”

हेही वाचा: IND vs AUS: ‘एक पूल शॉट तर बनतोच ना राव!’, रो-हिटचा स्वॅग अन् त्याच्या शॉटमागील उलगडले रहस्य, मुलाखतीचा Video व्हायरल

पुढे बोलताना तो म्हणाला की, “खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना जास्त मदत नव्हती. मला तर वाटते ऑस्ट्रेलियन संघ ज्यावेळी भारतात येण्यासाठी विमानात बसला, त्यावेळीच ते चेंडू वळणार या विचारांच्या भीतीने घाबरले होते. खेळपट्टीची हीच भीती त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरली.” जडेजासह सहकारी दुसरा अष्टपैलू अक्षर पटेल यानेदेखील ऑस्ट्रेलियन संघाला टोमणे मारताना म्हटलेले की, ‌”आम्ही फलंदाजी करताना खेळपट्टी आमच्या बाजूने होती तर गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध कशी असू शकते? हे सर्व काही मानसिक आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus he must have been scared even in flight ravindra jadeja retorted on allegations of dishonesty stopped speaking of kangaroos avw