IND vs AUS 4th Test Day 2 Updates in Marathi: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाने धावांचा डोंगर उभारला आहे. मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्याच डावात ४७४ धावा करत भारतासमोर मोठं आव्हान ठेवलं आहे. स्टीव्हन स्मिथने शानदार शतक झळकावत १४० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. आता भारतीय संघाला पुनरागमन करण्यासाठी चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने ५ बाद १६५ धावा केल्या होत्या. भारताला आता फॉलोऑन टाळण्यासाठी किती धावांची आवश्यकता आहे, जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारताच्या डावाची सुरूवात फारशी चांगली झाली नाही आणि संघाचा कर्णधार रोहित शर्मा जो पुन्हा आपल्या सलामीवीराच्या भूमिकेत मैदानात उतरला होता, तो केवळ ५ चेंडू खेळत ३ धावा करून बाद झाला. यानंतर केएल राहुल आणि यशस्वी जैस्वालने भारताला ५० धावांचा टप्पा गाठून दिला. यानंतर टीब्रेक पूर्वी केएल राहुल अखेरच्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला आणि माघारी परतला. यानंतर विराट कोहली आणि यशस्वी जैस्वालने १०० धावांची भागीदारी रचली तर यशस्वी जैस्वालने शानदार अर्धशतक झळकावले. पण एक धाव घेण्याच्या नादात यशस्वी जैस्वालने स्वत:लाच धावबाद करून घेतलं आणि ८२ धावांवर विकेट गमावली. यानंतर विराट कोहलीही एक षटक खेळून बाहेर जाणारा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. तर नाईट वॉचमन म्हणून आलेला आकाशदीपदेखील स्वस्तात माघारी परतला. यासह भारताने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत १६५ धावा केल्या आहेत.

हेही वाचा – IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात नेमकं काय घडलं? उस्मान ख्वाजाने सांगितला प्रसंग

फॉलोऑन वाचवण्यासाठी भारताला २७५ धावा कराव्या लागतील. आता टीम इंडियाला फॉलोऑन टाळण्यासाठी अजून ११० धावांची गरज आहे. तसे न झाल्यास ऑस्ट्रेलियन संघ भारताला डाव संपताच दुसऱ्या डावात प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण करू शकतो. ब्रिस्बेनमध्ये भारताच्या १०व्या आणि ११व्या क्रमांकाच्या खेळाडूंनी म्हणजेच आकाशदीप आणि बुमराहने भारताचा फॉलोऑन टाळला होता. आता मैदानावर ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजाची जोडी आहे.

हेही वाचा – IND vs AUS: ‘विराट कोहली जोकर’, ऑस्ट्रेलियन मीडियाने कोन्स्टासबरोबरच्या वादानंतर विराटला केलं लक्ष्य, वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर असा फोटो…

स्टीव्ह स्मिथचं शतक

स्टीव्ह स्मिथने सलग दुसऱ्या कसोटीत शतक झळकावून ऑस्ट्रेलियाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. त्याने आपले ३४वे कसोटी शतक झळकावून लिटल मास्टर सुनील गावस्कर यांची बरोबरी केली. भारताविरुद्ध सर्वाधिक ११ कसोटी शतकं झळकावणारा फलंदाज ठरला आहे.