India vs Australia T20 Series, Predication playing 11: २३ नोव्हेंबरपासून, विश्वचषक संपल्यानंतर अवघ्या चार दिवसांनी, भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी आमनेसामने येणार आहेत. या मालिकेकडे टीम इंडियाच्या २०२४ टी-२० विश्वचषकाच्या तयारीची सुरुवात म्हणून पाहिले जात आहे. टी-२० विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला या मालिकेसह तीन टी-२० मालिका खेळायच्या आहेत. या टी-२० मालिकेसाठी रोहित-कोहलीसह विश्वचषक खेळलेल्या बहुतांश वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. या टी-२० मालिकेसाठी संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवडलेला संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या संघासारखाच आहे. विश्वचषकात न खेळलेले केवळ सूर्यकुमार आणि अक्षर पटेल यांचेच संघात पुनरागमन झाले आहेत. या टी-२० मालिकेत सर्वांच्या नजरा ऋतुराज गायकवाड, इशान किशन आणि यशस्वी जैस्वाल यांच्यावर असतील. त्यांना २०२४च्या टी-२० विश्वचषकात स्थान मिळवण्यासाठी ही खूप मोठी संधी असणार आहे.

Harshit Rana angers Mitchell Starc with bouncer barrage video viral
Harshit Rana vs Mitchell Starc : ‘मी तुझ्यापेक्षा वेगवान गोलंदाजी…’, हर्षित राणाचा बाऊन्सर पाहून मिचेल स्टार्कने दिली धमकी, VIDEO व्हायरल
IND vs AUS Australia All Out on 104 Runs 4th Lowest Score Against India in Test Cricket Jasprit Bumrah 5 Wickets
IND vs AUS: भारताचं ऐतिहासिक पुनरागमन, ऑस्ट्रेलियाची पहिल्या…
Hazrat Bilal bowled the biggest no ball in the history of cricket video viral
Hazrat Bilal No Ball : क्रिकेटच्या इतिहासात यापेक्षा मोठा ‘नो बॉल’ कधीच पाहिला नसेल, फाफ डू प्लेसिसही झाला चकित ; VIDEO व्हायरल
Mitchell Starc Statement on KL Rahul Controversial Wicket on Day 1 IND vs AUS Perth Test
IND vs AUS: “हा विकेट नियमानुसार…”, केएल राहुलच्या वादग्रस्त विकेटवर मिचेल स्टार्कचं मोठं वक्तव्य; नियमाचा उल्लेख करत नेमकं काय म्हणाला?
Nitish Reddy reveals chat with coach Gautam Gambhir before IND vs AUS Perth test
Nitish Reddy : ‘जसं तुम्ही देशासाठी गोळी झेलत आहात…’, असं का म्हणाला गौतम गंभीर? पदार्पणवीर नितीश रेड्डीने केला खुलासा
IPL 2025 Auction Time Changes Due to Broadcasters Request To Avoid Overlap With IND vs AUS Perth Test
IPL Auction 2025: IPL महालिलावाची अचानक बदलली वेळ, नेमका किती वाजता सुरू होणार लिलाव? काय आहे कारण?
d gukesh chess championship
गुकेशपर्वाची नांदी…?
Rishabh Pant Becomes Only Third Indian Batter Who Completes 2000 Runs in WTC History After Rohit Sharma Virat kohli
IND vs AUS: ऋषभ पंतची नव्या विक्रमाला गवसणी, रोहित-विराटनंतर कसोटीत ‘ही’ कामगिरी करणारा तिसरा फलंदाज
IND vs AUS Australia embarrassing record of losing 5 wickets for less than 40 runs in a home Test 2nd Time after since 1980
IND vs AUS : भारतीय गोलंदाजांपुढे ऑस्ट्रेलियाची उडाली भंबेरी! ४४ वर्षांत कांगारु संघावर दुसऱ्यांदा ओढवली ‘ही’ नामुष्की

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-२० सामना २३ नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी भारताचा संभाव्य अंतिम अकरा संघ कसा असू शकतो, यावर एक नजर टाकूया.

हेही वाचा: IPL 2024: गौतम गंभीरचे कोलकता नाईट रायडर्समध्ये पुनरागमन, आयपीएल २०२४मध्ये बजावणार ‘ही’ भूमिका

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० साठी भारताची संभाव्य प्लेईंग-११

यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये भारताच्या प्लेइंग-११च्या सलामीची जबाबदारी पार पाडू शकतात. दुसरीकडे, यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो. यानंतर मोठे फटके मारण्यात माहीर असलेला तिलक वर्मा पाचव्या क्रमांकावर खेळायला येऊ शकतो. गरज भासल्यास तिलक वर्मा ऑफ स्पिन गोलंदाजीही करू शकतो, म्हणजेच तो अष्टपैलू खेळाडूची भूमिकाही बजावू शकतो.

हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत रिंकू सिंगला फिनिशरच्या भूमिकेत स्थान मिळवण्याची ही सुवर्ण संधी असेल. रिंकूला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळू शकते. गेल्या आयपीएल हंगामात आपल्या झंझावाती फलंदाजीने सर्वांना प्रभावित केल्यानंतर, रिंकूने आयर्लंड दौऱ्यावर टी-२० मालिकेतही छाप सोडली होती.

अक्षर पटेल अष्टपैलू खेळाडूची भूमिका साकारणार हे जवळपास निश्चित झाले आहे. फिरकी गोलंदाजीची जबाबदारी वॉशिंग्टन सुंदरच्या खांद्यावर असेल. वेगवान गोलंदाजीची जबाबदारी अर्शदीप सिंगच्या नेतृत्वाखाली प्रसिध कृष्णा आणि मुकेश कुमार यांच्याकडे दिली जाऊ शकते.

हेही वाचा: Team India: टी-२० विश्वचषकात रोहित-विराट पुनरागमन करणार? आयपीएलमधील कामगिरीनंतर घेणार निर्णय

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या T20 साठी भारताची संभाव्य एकादश:

भारत: ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, प्रसीध कृष्णा, मुकेश कुमार.

ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई , अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार, श्रेयस अय्यर (टी-२० मध्ये चौथा, पाचवा)