पर्थ कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाचा संघ विजयाच्या जवळ आला आहे. दुसऱ्या डावात २८७ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाचे ५ गडी माघारी परतले आहेत. भारताने दुसऱ्या डावात ११२ धावा केल्या असून विजयासाठी अजुन १७५ धावांची गरज आहे. मात्र चौथ्या दिवसाच्या खेळात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने धुर्त खेळी करण्याचा प्रयत्न केला. मुरली विजय फलंदाजी करत असताना टीम पेनने त्याला स्लेजिंग करण्यास सुरुवात केली. त्याचं हे स्लेजिंग स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झालं आहे.

“अरे, मुरली मला माहिती आहे की तो (विराट) तुमचा कर्णधार आहे. पण एक माणूस म्हणून तो तुला नक्कीच आवडत नसेल.” साहजिकचं मुरली विजयने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं, मात्र भारतीय फलंदाजांबद्दल अशा प्रकारचं स्लेजिंग करुन टीम पेन भारतीय संघाच फूट पाडण्याचा प्रयत्न करतोय का ? अशी शंका घेण्यासाठी नक्कीच वाव आहे.

Story img Loader