Australian Cricketers Described ICC, BCCI and Indian Cricket team: मेलबर्न कसोटीसाठी टीम इंडिया जोमानं तयारी करत आहे. २६ डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे कसोटीला सुरुवात होणार आहे. दरम्यान समोर आलेल्या एका व्हीडिओमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी भारतीय क्रिकेट बोर्ड आणि भारतीय क्रिकेटचे कौतुक केले आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनीही हे मान्य केलं आहे की बीसीसीआय किती ‘पॉवरफुल’ आहे.

सध्याच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियासाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरलेल्या ट्रॅव्हिस हेडनेच्या उत्तराने भारतीय चाहत्यांची मने जिंकली आहेत. तर स्टीव्ह स्मिथच्या उत्तराने तर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं पण त्याने मात्र माघार घेत पुन्हा उत्तर बदललं. आयसीसी, बीसीसीआय आणि भारतीय क्रिकेटचं एका शब्दात वर्णन करायचं होतं, यावर हेड आणि इतर कांगारू खेळाडूंनी काय काय उत्तर दिलं आहे, पाहूया.

हेही वाचा – Vinod Kambli: विनोद कांबळीची तब्येत बिघडली, तात्काळ रूग्णालयात केलं दाखल

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंना भारतीय क्रिकेट, बीसीसीआय आणि आयसीसीचे एका शब्दात वर्णन करण्यास सांगितले होते. यावर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने तिघांनाही ‘Big (मोठं)’ असं संबोधलं. तर ट्रॅव्हिस हेडच्या उत्तराने मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

हेही वाचा – PV Sindhu Wedding: पीव्ही सिंधूने बांधली लग्नगाठ, विवाह सोहळ्यातील पहिला फोटो आला समोर

हेडने बीसीसीआयला ‘(Rulers) सत्ता गाजवणारे’ म्हटले. तर आयसीसी दुसऱ्या क्रमांकावर असं उत्तर दिलं आहे. त्याने भारतीय क्रिकेटचे वर्णन (‘Strong)मजबूत ‘ असल्याचे म्हटले. अनुभवी फिरकीपटू नॅथन लायनने बीसीसीआयला ‘बिग’, आयसीसीला ‘बॉस’ आणि भारतीय क्रिकेटला ‘(Passionate) उत्कट’ असं संबोधलं. याशिवाय ग्लेन मॅक्सवेलने आयसीसीला ‘बॉस’ आणि बीसीसीआयला ‘ (Powerful) शक्तिशाली’ असे वर्णन केले.

हेही वााचा – Shreys Iyer: श्रेयस अय्यरची कमाल, ९व्या क्रमांकावर फलंदाजीला आला अन् २० चेंडूत पालटला सामना; मुंबईचा दणदणीत विजय

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथनेही बीसीसीआयचे कौतुक केले. त्याने भारतीय क्रिकेट बोर्डाला ‘पॉवरहाऊस’ म्हटले. जेव्हा त्याला आयसीसीबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने आयसीसीचे वर्णन ‘इतकं शक्तिशाली नाही’ असे केले. तो आयसीसीला बीसीसीआयपेक्षा कमी शक्तिशाली असल्याचं बोलू पाहत होता, पण तितक्यात हसला आणि म्हणाला, ‘नाही, नाही, मी असं म्हणू शकत नाही. एक विनोद होता’.

हेही वाचा – PV Sindhu Wedding: कोण आहे पीव्ही सिंधूचा पती व्यंकट दत्ता साई? आयटी व्यावसायिक ते ‘या’ IPL संघाशी आहे कनेक्शन

आयसीसीच्या चेयरमनपदी विराजमान झालेल्या जय शाह यांनी यापूर्वी बीसीसीआयमध्ये मोठी भूमिका बजावली आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. जय शहा बराच काळ बीसीसीआयचे सचिव होते. त्यांनी १ डिसेंबरपासून आयसीसीच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत.

Story img Loader