IND vs AUS, ICC U19 Word Cup 2024: बेनोनी येथील विलोमूर पार्क येथे आयसीसी अंडर १९ विश्वचषक 2024 मध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. भारत व ऑस्ट्रेलियाने अनुक्रमे दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानविरुद्ध उपांत्य फेरीत विजय मिळवून अंतिम फेरी गाठली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या आयसीसी विश्वचषकच्या अंतिम सामन्यात भारताचा मागील वर्षी झालेला पराभव अजूनही लक्षात असताना आज अंडर १९ चा संघ त्या पराभवाचा बदला घेऊ शकेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
उपांत्य फेरीत भारतीय कर्णधार उदय सहारन याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले होते. सचिन धसच्या ९६ धावांच्या खेळीने भारताने दक्षिण आफ्रिकेचा दोन गडी राखून पराभव केला होता. ३२ धावांवर चार विकेट्स गमावलेल्या भारतीय संघाला धस आणि सहारन यांनी एकत्रितपणे मजबूत भागीदारी करून अंतिम फेरीच्या स्पर्धेत कायम ठेवले. प्रत्येकी तीन बळी घेणाऱ्या क्वेना माफेका आणि ट्रिस्टन लुस यांच्या भेदक गोलंदाजीला निष्फळ ठरवून भारताने अंतिम फेरी गाठली आहे.
दुसरीकडे, पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा उपांत्य सामना सुद्धा अत्यंत अटीतटीचा झाला होता. अली रझाने चार विकेट्स घेतल्यानंतरही ऑस्ट्रेलियाने केवळ पाच चेंडू आणि एक विकेट शिल्लक असताना १७९ धावांचे आव्हान पूर्ण करत अंतिम फेरीत धडक दिली. आज हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार आहेत.
India vs Australia, U19 Cricket World Cup Final: लाईव्ह स्ट्रीमिंगचे तपशील
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंडर 19 विश्वचषक फायनल कधी होणार?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी, ११ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी १:३० वाजता अंडर १९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना होईल.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 19 वर्षाखालील विश्वचषक फायनल कुठे होणार आहे?
बेनोनी येथील सहारा पार्क विलोमूर क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंडर १९ क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत होणार आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंडर 19 विश्वचषक फायनल कुठे पाहता येईल?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंडर 19 वर्ल्ड कप फायनलचे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण केले जाईल आणि हॉटस्टारवर लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे.
टीम इंडिया संभाव्य प्लेइंग XI : आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारन (क), प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, नमन तिवारी, राज लिंबानी, सौम्य पांडे.
हे ही वाचा << जसप्रीत बुमराहची ‘त्या’ ऐतिहासिक कामगिरीनंतर पहिली प्रतिक्रिया; सणसणीत उत्तर देत टीकाकारांना लावली चपराक
टीम ऑस्ट्रेलिया संभाव्य प्लेइंग XI: हॅरी डिक्सन, सॅम कोन्स्टास, ह्यू वेबगेन (क), हरजस सिंग, रायन हिक्स (विकेटकीपर), ऑली पीक, टॉम कॅम्पबेल, राफ मॅकमिलन, टॉम स्ट्रेकर, महाली बियर्डमन, कॅलम विडलर.