IND vs AUS 2nd Test Match Updates in Marathi: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ॲडलेडमध्ये दुसरा कसोटी सामना सुरू आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने ॲडलेड कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी दुसऱ्या सत्रात १८० धावा करत सर्वबाद झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कसमोर भारतीय फलंदाज हतबल दिसत होते. मिचेल स्टार्कने ६ विकेट्स घेत भारताविरूद्ध पहिल्यांदाच ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिवस-रात्र कसोटी सामन्यात एखाद्या संघाला २०० धावांचा टप्पा गाठता आला नाही, अशी ही पहिलीच वेळ आहे. आत्तापर्यंत, ऑस्ट्रेलियाविरुद्ध पिंक बॉल कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात २०२, २५९/९ आणि २४४ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने इथे पहिल्या डावात ४४२/८, ५८९/३, ४७३/९ आणि ५११/७ धावा केल्या आहेत.

हेही वाचा – IND vs AUS: ‘स्लो बॉल?’ स्टार्कने पहिल्याच चेंडूवर जैस्वालला बाद करत घेतला बदला, पर्थमध्ये मारला होता टोमणा, पाहा VIDEO

भारताच्या फलंदाजीची सुरूवात खराब झाली. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल ही जोडी सलामीला उतरली होती. पण स्टार्कच्या सामन्यातील पहिल्याच चेंडूवर जैस्वाल पायचीत झाला आणि भारताला मोठा धक्का बसला. यशस्वीने पर्थ कसोटीत उत्कृष्ट १६१ धावांची खेळी केली होती. यानंतर केएल राहुल आणि शुबमन गिलने भारताचा डाव सावरला. शुबमन गिल ३१ धावा करत बोलँडच्या गोलंदाजीवर पायचीत झाला तर केएल राहुल ३७ धावा करत स्टार्कच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.

हेही वाचा – Harry Brook Century: हॅरी ब्रूकची शतकाची परंपरा कायम, डॉन ब्रॅडमन यांचा मोडला विक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा पहिला फलंदाज

विराट कोहली आणि रोहित शर्मा या कसोटीत अपयशी ठरले. विराट ७ तर रोहित शर्मा ३ धावा करत बाद झाला. यानंतर पंतने २२ आणि अश्विनने २१ धावा करत महत्त्वपूर्ण धावांचे योगदान दिले. तर नितीश रेड्डीने पर्थ कसोटीनंतर पुन्हा एकदा अॅडलेड कसोटीतही ४२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, या खेळीदरम्यान त्याने ३ चौकार आणि ३ षटकार लगावले आहेत.

हेही वाचा – नो बॉल अन् ३७ धावा! ॲडलेड आणि वेलिंग्टन कसोटीत १२ मिनिटांच्या फरकाने घडली आश्चर्यचकित करणारी घटना

मिचेल स्टार्कने १४.१ षटकांत ४८ धावा देत ६ विकेट्स घेतल्या. स्टार्कने यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, नितीश रेड्डी, हर्षित राणा, आर अश्विन यांना बाद करत भारताचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये धाडले. तर स्टार्कशिवाय कमिन्स आणि बोलँडने २-२ विकेट्स घेतल्या.