IND vs AUS, 1st Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांची बॉर्डर गावसकर कसोटी मालिका सुरू होताच थरार, वादविवाद, आरोप-प्रत्यारोप आणि स्लेजिंगची मालिका सुरू झाली आहे. क्रिकेटच्या मैदानावर भारत-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंमधील वादविवादापासून आता मैदानाबाहेर कॉमेंट्री बॉक्समध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी सुरु झाल्या आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपुरात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी कॉमेंट्री करताना भारत आणि ऑस्ट्रेलियाचे दोन दिग्गज समालोचक एकमेकांना भिडले. या दोन टीकाकारांमध्ये जोरदार वादावादी झाली.

लाइव्ह कॉमेंट्री दरम्यान भारत-ऑस्ट्रेलिया दिग्गजांमध्ये भिडले

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपुरात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी कॉमेंट्री करताना भारताचा महान यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक आणि ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मार्क वॉ एकमेकांना भिडले. दिनेश कार्तिक आणि मार्क वॉ यांच्या या वादात एका गोष्टीने आगीत आणखीनच भर पडली आहे. खरे तर नागपूर कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या १७७ धावांत गुंडाळला, जो ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मार्क वॉला सहन झाला नाही.

Border-Gavaskar Trophy Test series Team India defeat australia jasprit bumrah virat kohli rohit sharma
विश्लेषण : बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत टीम इंडियाच्या पराभवास कारणीभूत ठरले हे सहा घटक…
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
IND vs AUS Who is Beau Webster Debutante who hit the winning four for Australia in his Sydney test in BGT 2025
IND vs AUS : पदार्पणात अर्धशतक अन् विजयी चौकार! कोण आहे ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ब्यू वेबस्टर? सिडनी कसोटीत भारतासाठी ठरला डोकेदुखी
IND vs AUS Yashasvi Jaiswal Video Viral
IND vs AUS : यशस्वी जैस्वालची कसोटीत टी-२० शैलीत फटकेबाजी! मिचेल स्टार्कला फोडला घाम, VIDEO व्हायरल
BBL 2025 Daniel Sams and Cameron Bancroft clashing Video
BBL 2025 : मैदानातच भीषण अपघात! कॅच घेण्याच्या नादात दोन खेळाडूंमध्ये जोरदार धडक, एकाच फुटलं नाक, VIDEO व्हायरल
IND vs AUS : प्रसिध कृष्णाचं जबरदस्त कमबॅक! ॲलेक्स कॅरीचा उडवला त्रिफळा, VIDEO होतोय व्हायरल
Jasprit Bumrah stares down Sam Konstas After Usman Khwaja Wicket and Team India Aggressive Celebration Video viral
IND vs AUS: बुमराहचा जळता कटाक्ष अन् भारताचं आक्रमक सेलिब्रेशन! कॉन्स्टासने वाद घातल्यानंतर ख्वाजाच्या विकेटचा VIDEO व्हायरल
IND vs AUS 5th Test Predicted Playing 11 Full Squad Players List Match Timing Live Telecast
IND vs AUS: रोहित शर्माच्या विश्रांतीच्या निर्णयानंतर प्लेइंग इलेव्हन कशी असणार? सिडनी कसोटी किती वाजता सुरू होणार?

हेही वाचा: Ravindra Jadeja Video: ‘रोहितची रणनीती, अश्विनच्या युक्त्या आणि जडेजाच्या फिरकीवर कधीच शंका घ्यायची नसते; बॉल टॅम्परिंग वादावर दिले सडेतोड उत्तर

या गोष्टीमुळे आगीत आणखीनच भर पडली

चहापानाच्या दरम्यान, भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक आणि ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मार्क वॉ एकमेकांशी भिडले. दोघांमध्ये ऑन एअर वादावादी झाली. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १७७ धावांत गुंडाळल्यानंतर टीम इंडियाने फलंदाजीत दमदार सुरुवात केली आणि १ गडी बाद ७७ धावा केल्या. या सामन्यात भारताने मजबूत धावसंख्येचा पाया रचला आहे. दिनेश कार्तिकने मार्क वॉला सांगितले की, “मला वाटते की भारत कसोटी सामन्यात एकदाच फलंदाजी करेल.” यावर मार्क वॉने दिनेश कार्तिकला प्रत्युत्तर दिले आणि म्हणाला, “डीके पुढे काय होते ते आम्ही नक्कीच पाहू. तू बोलतोस तेवढे सोपे तर मुळीच नाही, इथे बोलून दाखवण्याइतके जेवढे सोपे आहे तेवढे सरळ मैदानावर जाऊन धावा केल्यासारखे अजिबात नाही.”

हेही वाचा: IND vs AUS: “बोटांना लावले की फिरकी…”, पहिल्याच दिवशी पाच विकेट्स घेणाऱ्या जडेजावर गंभीर आरोप करणाऱ्या कांगारूंचा रडीचा डाव!  

कॉमेंट्री बॉक्समध्ये वातारणात अधिक तापले

यानंतर दिनेश कार्तिकने मार्क वॉला चोख प्रत्युत्तर दिले आणि म्हणाला, “ही खेळपट्टी ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी जितकी अवघड आहे तितकी अवघड नाही.” यानंतर मार्क वॉने दिनेश कार्तिकच्या मुद्द्यावर प्रत्युत्तर देत म्हटले, “जोपर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांचे फलंदाज या खेळपट्टीवर फलंदाजी करत नाहीत तोपर्यंत काहीही ठरवू नका. काही भारतीय कसोटी फलंदाज ऑस्ट्रेलियन फलंदाजांइतके चांगले नाहीत. मला माहित नाही की कोणत्या दोन लोकांची सरासरी ६० पेक्षा जास्त आहे.”

Story img Loader