IND vs AUS 1st Test Highlights in Marathi: भारतीय संघाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ सुरूवात ऐतिहासिक विजयाने केले आहे. पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात १५० धावांत ऑल आऊट झाल्यानंतर भारताने या सामन्यात अप्रतिम पुनरागमन केलं. १५० वर सर्वबाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाला भारताने २९५ धावांनी पराभूत करत मोठा ऐतिहासिक विजय नोंदवला आहे.

भारताची पहिल्या डावातील स्थिती पाहता टीम इंडिया या सामन्यात पुनरागमन करेल अशी आशा कोणालाच नव्हती. पण जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील संघाने पर्थमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कर्णधार असलेल्या बुमराहने संघाचे नेतृत्त्व करत ८ विकेट्स घेत भारताच्या विजयात मोठी भूमिका बजावली. इतर गोलंदाजांनीही बुमराहला चांगली साथ दिली. तर दुसऱ्या डावात भारताच्या यशस्वी जैस्वाल, केएल राहुल आणि विराट कोहली यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत भारताच्या विजयाचा पाया रचला.

maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Sanju Samson Tilak Varma Smash World Record in Johannesburg with Fiery Centuries in T20I IND vs SA
IND vs SA: तिलक वर्मा-संजू सॅमसनचे ‘वर्ल्ड रेकॉर्ड’, जोहान्सबर्गमध्ये लावली विक्रमांची चळत; वाचा १० अनोखे विक्रम
Rahul Gandhi ashok chavan nanded
नांदेडमध्ये राहुल गांधींकडून चव्हाण कुटुंबिय बेदखल !
Ranji Trophy Goa Batters Highest Ever Partnership in 90 Year Old History
Ranji Trophy: ६०६ धावांची विक्रमी भागीदारी अन् गोव्याच्या २ फलंदाजांची त्रिशतकं, रणजी ट्रॉफीच्या ९० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही
Indian Cricket Team Creates History Becomes First Team To Score 5 T20I International Century in 2024 IND vs SA Tilak Varma
IND vs SA: तिलक वर्माच्या शतकासह भारतीय संघाने घडवला इतिहास, टी-२० क्रिकेटमध्ये २०२४ मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला संघ
Pankaja Munde At Rally In Parali Beed.
“डोळ्यांसमोर कमळ येईल, पण तुम्ही घड्याळाचेच बटन दाबा…” धनंजय मुंडेंच्या समोरच काय म्हणाल्या पंकजा? पाहा व्हिडिओ

हेही वाचा – IND vs AUS: भारताने भेदलं पर्थचं चक्रव्यूह! ऑस्ट्रेलियावर मिळवला ऐतिहासिक विजय; कसोटीच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही

भारताच्या ऑस्ट्रेलियावरील पर्थ कसोटीतील विजयासह SENA देशांमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) धावांच्या बाबतीत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठा विजय मिळवला. पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला प्रथमच पराभव पत्करावा लागला आहे.

हेही वाचा – WTC Points Table मध्ये पुन्हा भारताचा दबदबा, पराभवासह ऑस्ट्रेलियाला दिला दुहेरी झटका

भारतीय संघाचा २९५ धावांनी विजय हा केवळ ऑस्ट्रेलिया विरूद्धच मोठा विजय नाही तर भारतीय संघाचा सेना देशांमधील सर्वात मोठा विजय ठरला. याआधी भारताने १९८६ मध्ये लॉड्समध्ये इंग्लंडचा २७९ धावांनी पराभव केला होता. अशा प्रकारे भारताला ३८ वर्षांनंतर सेना देशांमध्ये एवढा मोठा विजय मिळाला आहे. विदेशातील भूमीवर भारताचा सर्वात मोठा विजय २०१९ मध्ये संघाने नोंदवला, जेव्हा भारताने वेस्ट इंडिजचा ३१८ धावांनी पराभव केला. भारताने घरच्या मैदानावरही श्रीलंकेचा ३०० हून अधिक धावांनी पराभव केला आहे. एकूणच हा विजय भारताचा विदेशी भूमीवरील सर्वात मोठा विजय आहे.

हेही वाचा – IPL Mega Auction 2025 Live Updates: आज ४९३ खेळाडूंवर लागणार बोली, RCB-MI कडे सर्वाधिक रक्कमहेही वाचा –

भारताचा सेना देशांमधील सर्वात मोठा विजय

२९५ वि ऑस्ट्रेलिया, पर्थ २०२४
२७९ वि इंग्लंड, लॉड्स १९८६

भारताचा ऐतिहासिक विजय

टीम इंडियासाठी हा विजय ऐतिहासिक ठरला आहे. भारताने यापूर्वी कधीही ऑस्ट्रेलियाविरुद्धचा कसोटी सामना ऑस्ट्रेलियात इतक्या मोठ्या फरकाने जिंकला नव्हता. हा विजय टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठा कसोटी विजय आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचा हा दुसरा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी टीम इंडियाने मोहालीत ऑस्ट्रेलियाचा ३२० धावांनी पराभव केला होता. पर्थमध्ये कसोटी सामना जिंकणारा बुमराह हा दुसरा आशियाई कर्णधार ठरला आहे. योगायोगाने यापूर्वीचा कर्णधारही भारतीय गोलंदाज होता. अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखाली २००८ मध्ये भारताने WACA (पर्थचे जुने स्टेडियम) येथे विजय मिळवला होता.

हेही वाचा – IND vs AUS : ट्रॅव्हिस हेडच्या विकेटनंतर टीम इंडियाचा एकच जल्लोष! बुमराह-विराट आक्रमक झाल्याचा VIDEO व्हायरल

भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सर्वात मोठा विजय (धावांच्या बाबतीत)

३२० धावांनी – मोहाली, २००८
२९५ धावांनी – पर्थ २०२४
२२२ धावांनी – मेलबर्न, १९७७
१७९ धावांनी – चेन्नई, १९९८
१७२ धावांनी – नागपूर, २००८

भारताचा आशिया खंडाबाहेर दुसरा सर्वात मोठा विजय (धावांच्या बाबतीत)

वेस्ट इंडिज वि. ३१८ धावांनी, नॉर्थ साउंड २०१९
ऑस्ट्रेलिया वि. २९५ धावांनी. पर्थ २०२४
इंग्लंड वि. २७९ धावांनी, हेडिंग्ले, १९८६
न्यूझीलंड वि. २७२ धावांनी ऑकलंड, १९६८
वेस्ट इंडीज वि. २५७ धावांनी, किंग्स्टन, २०१९

कसोटी सामन्यात भारताच्या कर्णधाराची सर्वाेत्तम कामगिरी

१०/१३५ – कपिल देव वि. WI, अहमदाबाद, १९८३
१०/१९४ – बिशन सिंग बेदी वि. AUS, पर्थ (WACA), १९७७
९/७० – बिशन सिंग बेदी वि. NZ, चेन्नई, १९७६
८/७२ – जसप्रीत बुमराह वि. AUS, पर्थ (ऑप्टस), २०२४
८/१०९ – कपिल देव वि. AUS, ॲडलेड, १९८५