Shubman Gill Injury Update Ahead of IND vs AUS Perth test: भारताच्या गोलंदाजी प्रशिक्षकांनी पर्थ कसोटीपूर्वी शुबमन गिलच्या दुखापतीबाबत मोठे अपडेट दिले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरला पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. ज्यामध्ये शुबमन गिल अंगठ्याच्या दुखापतीमुळे बाहेर झाल्याचे म्हटले जात आहे. पण आता गिलबाबत ताजे अपडेट समोर आले आहे.

पर्थ कसोटीत शुबमन गिल खेळण्याची शक्यता

पहिल्या कसोटी सामन्यात शुबमन गिल दुखापतीमुळे खेळणार नसल्याची माहिती समोर आली होती. सराव सामन्यादरम्यान गिलला दुखापत झाली आणि त्याला मैदान सोडावे लागले. त्यानंतर गिल पर्थ कसोटीत खेळू शकणार नसल्याचे वृत्त समोर आले होते. आता गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल पत्रकार परिषदेत म्हणाला, “तो दिवसागणिक दुखापतीतून बरा होत आहे. आम्ही कसोटीच्या दिवशी सकाळी निर्णय घेऊ. सराव सामन्यादरम्यान त्याने चांगली कामगिरी केली. त्यामुळे तो यशस्वी होईल अशी आशा आहे.”

Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका
Alzarri Joseph fined by ICC for abusing fourth umpire in WI-BAN ODI Month after two-match ban for on-field tiff
Alzarri Joseph: अल्झारी जोसेफला दोन सामन्यांच्या बंदीनंतर ICC ने ठोठावला दंड, पंचांना केली होती शिवीगाळ
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
Rohit Sharma on Mohammed Shami Fitness and Comeback in Team for last 3 Test Against Australia
IND vs AUS: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या कसोटी पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?
Mohammed Shami Can Join Team India in Australia After NCA Fitness Report IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमीबाबत दुसऱ्या कसोटीदरम्यान मोठी अपडेट, टीम इंडियासाठी आनंदाची बातमी
Mohammed Siraj Travis Head fight after wicket in IND vs AUS 2nd test Video
VIDEO: सिराज आणि हेड लाईव्ह सामन्यातच भिडले, क्लीन बोल्ड झाल्याने हेड संतापला अन् सिराजनेही दाखवले डोळे

हेही वाचा – IND vs AUS: भारतीय संघ पर्थ कसोटीत फिरकीपटू म्हणून फक्त अश्विनलाच देणार संधी, काय आहे कारण?

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये शुबमन गिलचं खेळणं टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. गिलला ऑस्ट्रेलियात खेळण्याचाही चांगला अनुभव आहे. २०२०-२१ मध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्येही गिल टीम इंडियाचा भाग होता. या मालिकेदरम्यान त्याने चांगली कामगिरी केली होती. त्यावेळी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला २-१ ने पराभूत केले होते.

हेही वाचा – Border Gavaskar Trophy 2024 Schedule: भारतीय वेळेनुसार बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचं कसं असणार वेळापत्रक? पहाटे किती वाजता सुरू होणार सामना?

ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय अ संघात देवदत्त पड्डिकलची निवड करण्यात आली होती. या सामन्यांनंतर पड्डिकलला ऑस्ट्रेलियातच थांबवण्यात आले आहे. गिलच्या दुखापतीनंतर पर्थ कसोटीत गिलच्या जागी देवदत्त पड्डिकलला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळू शकते, असे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे आता भारतीय संघ पहिल्या कसोटीपूर्वी काय निर्णय घेणार आणि संघाची प्लेईंग इलेव्हन कशी असणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

Story img Loader