भारतीय गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाच्या संघाला स्पष्ट संकेत दिला आहे कि, भारताचा कांगारूंना ४-० असे हरविण्याचा निर्धार आहे. नाणेफेक जिंकल्यांनंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या कांगारुंच्या संघाला सामन्याच्या दुस-याच षटकामध्ये इशांत शर्माने दोन जोरदार झटके दिले. त्याने सलामीचा फलंदाज डेविड वार्नरला विराट कोहलीच्या हाती शून्यावर झेलबाद करून पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. त्यानंतर मैदानात उतरलेल्या एड कोवनची साथ करण्यासाठी उतरलेल्या फिल ह्यूजेसने जोरदार फटकेबाजी करत डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यालाही ४५ धावांवर बाद करत कांगारूंना दडपणाखाली ठेवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. कसोटीच्या पहिल्या दिवशीच भोजनापर्यंत ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ १२८ धावांत गारद झाला. ऑस्ट्रेलियाचे आठ फलंदाज तंबूत परतले आहेत. ईशांत शर्मा, रविंद्र जाडेजाने प्रत्येकी दोन तर आर. अश्विनने चार फलंदाज तंबूत धाडले. दिवसअखेर ऑस्ट्रेलिया संघ ८ बाद २३१ धावांवर खेळत आहे. कोटलावर पहिल्या दिवशी भारतीय फिरकीपटूंचे वर्चस्व दिसून आले.
याआधी, शुक्रवारी सकाळी दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर भारताच्या विरूध्दच्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यामध्ये कर्णधार माइकल क्लार्कला दुखापत झाल्याने बाहेर बसला असून उपकर्णधार शेन वॉटसनच्या उपस्थितीत कांगारूंच्या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. याप्रकारे शेन वॉटसन ऑस्ट्रेलियाचा ४४ वा कसोटी कर्णधार झाला आहे. महत्वाची बाब म्हणजे माइकल क्लार्क आपल्या संपूर्ण कारकिर्दीत पहिल्यांदाच दुखापत झाल्याने कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. तसेच वॉटसनवर निलंबनाची कारवाई झाल्याने मोहाली टेस्टमध्ये तो खेळू शकला नव्हता.

Story img Loader