भारताविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने ४ धावांनी विजय मिळवला. पावसामुळे १७ षटकांच्या करण्यात आलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ४ बाद १५८ धावा केल्या होत्या. मात्र डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला १७ षटकात १७४ धावांचे आव्हान देण्यात आले. सलामीवीर शिखर धवनचे अर्धशतक (७६) आणि अनुभवी दिनेश कार्तिकच्या ३० धावांच्या खेळीनंतरही भारताने सामना जिंकता आला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
भारताने सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने सुरुवात काहीशी संथ केली. पण त्यानंतर फलंदाज आपल्या रंगात आले. डार्सी शॉर्ट ७ धावांवर स्वस्तात बाद झाला. पण कर्णधार फिंच आणि लीन यांनी तुफान फटकेबाजी करायला सुरुवात केली. फिंचने २४ चेंडूत २७ तर लीनने २० चेंडूत ३७ धावा फाटकावल्या. हे दोघे बाद झाल्यावर मॅक्सवेलने सामन्याचा ताबा घेतला आणि २३ चेंडूत ४६ धावा केल्या. स्टोयनीसने त्याला उत्तम साथ देत १९ चेंडूत ३३ धावा केल्या. भारताकडून कुलदीपने २ तर अहमद, बुमराने १-१ गडी बाद केला.
या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला केवळ १६९ धावाच करता आल्या. भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा ७ धावांवर बाद झाला. पाठोपाठ राहुल १३ धावांवर माघारी गेला. लगेचच कोहलीही ४ धाव करून तंबूत परतला. पण शिखर धवनने एकाकी झुंज देत ७६ धावा केल्या. पण तो झेलबाद झाला. कार्तिकने १३ चेंडूत ३० धावा केल्या. पण त्याची झुंज अपयशी ठरली.
ऋषभ पंत बाद, भारताचा पाचवा गडी माघारी
भारताचा सलामीवीर शिखर धवन ७६ धावांवर माघारी परतला आणि भारताला चौथा धक्का बसला. त्याने १० चौकार आणि २ षटकार लगावले. स्टॅनलेकच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला.
चाहत्याना सर्वाधिक अपेक्षा असणारा कर्णधार विराट कोहली झेलबाद झाला आणि भारताने तिसरा गडी गमावला. कोहलीने ८ चेंडूत केवळ ४ धावा केल्या.
लोकेश राहुलला १३ धावांवर तंबूत परतावे लागले. त्याने केवळ १३ चेंडू खेळले आणि त्यात केवळ १ चौकार मारला.
विंडीजविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात शिखर धवनला सूर गवसला होता. तीच लय कायम राखत त्याने या सामन्यात फटकेबाजी केली. त्याने २८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यात ९ चौकार आणि १ षटकार समाविष्ट आहेत.
मायदेशात गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरलेला सलामीवीर रोहित शर्मा पहिल्या सामन्यात स्वस्तात बाद झाला. ७ धावांवर त्याला बेहरेन्ड्रॉफने फिंचकरवी झेलबाद केले.
पावसामुळे १७ षटकांच्या करण्यात आलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ४ बाद १५८ धावा केल्या. मात्र पावसामुळे भारताला १७ षटकात डकवर्थ लुईस नियमानुसार १७४ धावांचे आव्हान देण्यात आले आहे.
पावसाच्या व्यत्ययानंतर सामना 17 षटकांचा करण्यात आला आहे. विश्रांतीनंतर पहिल्याच चेंडूवर बुमराहच्या गोलंदाजीवर मॅक्सवेल झेलबाद. कांगारुंचा चौथा घडी माघारी
पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबला; ऑस्ट्रेलिया ३ बाद १५३
स्फोटक फलंदाज ख्रिस लीन याने फटकेबाजी करण्यास सुरुवात केली होती. मात्र कुलदीपने त्याला स्वतःच्या गोलंदाजीवर झेलबाद केले.
कर्णधार फिंच २७ चेंडूत २४ धावा करून बाद झाला. त्याला कुलदीप यादवने अहमदकरवी झेलबाद केले. फिंचने तीन चौकार लगावले.
डावाची सुरुवात सावधपणे आणि संथगतीने केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने झटपट धावा जमावण्यास सुरुवात केली. त्यामुळे आठव्या षटकात ऑस्ट्रेलियाने अर्धशतक गाठले.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिला बळी नवोदित खलील अहमदने टिपला. त्याने डार्सी शॉर्ट याला आपल्या पहिल्याच चेंडूवर बाद केले. शॉर्ट १२ चेंडूत ७ धावा करून तंबूत परतला.
भारतीय संघ ६ फलंदाज, १ अष्टपैलू खेळाडू आणि ४ गोलंदाजासह मैदानात उतरत आहे. काल जाहीर करण्यात आलेल्या १२ खेळाडूंपैकी फिरकीपटू युझवेन्द्र चहलला अंतिम संघात स्थान देण्यात आलेले नाही.
--
अंतिम ११
--
काल जाहीर केलेला संघ
पहिल्या टी२० सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
----