WTC 2023 Final India vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीच्या (२०२१-२३) अंतिम फेरीत आमनेसामने आहेत. बुधवारपासून (७ जून) सुरू झालेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला. ऑस्ट्रेलियाने तीन गड्यांच्या मोबदल्यात ३२७ धावा केल्या आहेत. स्मिथ आणि हेडने भारतीय गोलंदाजांना नाकीनऊ आणत अक्षरशःधुतले. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ४०० धावा करण्यापासून रोखले तरच टीम इंडिया या सामन्यात पुनरागमन करू शकते.
सामन्याबद्दल बोलायचे, तर नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ८५ षटकांनंतर ३ बाद ३२३ धावा केल्या आहेत. सध्या खेळपट्टीवर ट्रॅव्हिस हेड (१४६) आणि स्टीव्ह स्मिथ (९१) धावांवर खेळत आहे. तत्पुर्वी उस्मान ख्वाजा (०) आणि डेव्हिड वार्नर ४३ धावांवर बाद झाला. ते मार्नस लाबूशेन २६ धावांचे योगदान देऊन बाद झाला. भारताकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकुरने प्रत्येकी १-१ विकेट घेतली. बाद झालेल्या तिन्ही फलंदाजांचे झेल यष्टिरक्षक श्रीकर भरतने टिपले.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारतासाठी पहिला दिवस काही खास नव्हता. कांगारू संघाविरुद्ध त्याला केवळ तीन विकेट्स घेता आल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने तीन गड्यांच्या मोबदल्यात ३२७ धावा केल्या आहेत. ट्रॅव्हिस हेड १५६ चेंडूत १४६ धावांवर नाबाद आहे. त्याने या खेळीत २२ चौकार आणि १ षटकार मारला आहे. त्याच वेळी, स्टीव्ह स्मिथ २२७ चेंडूत ९५ धावा केल्यानंतर नाबाद आहे. त्याने १४ चौकार मारले आहेत. हेड आणि स्मिथने चौथ्या विकेटसाठी २५१ धावांची भागीदारी केली.
सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराजने उस्मान ख्वाजाला बाद करून टीम इंडियाला सुरुवातीचे यश मिळवून दिले. ख्वाजा खाते उघडू शकला नाही आणि यष्टिरक्षक केएस भरतच्या हाती झेलबाद झाला.
लाबुशेन आणि वॉर्नर यांनी अर्धशतकी भागीदारी केली
ख्वाजानंतर क्रीजवर आलेल्या मार्निश लबुशेनने डेव्हिड वॉर्नरसह संघाच्या डावाचे नेतृत्व केले. लाबुशेन आणि वॉर्नर यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली. वॉर्नर ६० चेंडूत ४३ धावा करून बाद झाला. सिराजच्या चेंडूवर भरतने त्याचा झेल घेतला. उपाहारानंतर लाबुशेनला मोहम्मद शमीने क्लीन बोल्ड केले. त्याला ६२ चेंडूत केवळ २६ धावा करता आल्या. आता सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पुनरागमन करण्याकडे टीम इंडियाचे लक्ष असेल. त्याला ऑस्ट्रेलियन संघाला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखावे लागेल.
भारताने खेळलेल्या आयसीसी स्पर्ध्यांच्या या ११ फायनलपैकी माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग चक्क ७ फायनल खेळला आहे. तर विराट कोहली व रोहित शर्मा प्रत्येकी ६ फायनल खेळले आहेत. जगातील फक्त युवराज सिंग, कुमार संगकारा व माहेला जयवर्धने यांनीच ७ वेळा आयसीसीच्या स्पर्धांची फायनल खेळली आहे. पॉंटिंग, रोहित व विराटच्या नावावर आता प्रत्येकी ६ फायनल जमा झाल्या आहेत. भारताचा माजी कर्णधार एम. एस. धोनी याने आपल्या कारकिर्दीत ५ फायनल खेळल्या व त्यापैकी तीनमध्ये कर्णधार म्हणून विजेता होण्याचा मान त्याला मिळाला.