भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपुरात खेळला जात आहे. दरम्यान, टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्येही पुनरागमन करू शकणार नाही. याचा अर्थ तो संपूर्ण बॉर्डर गावस्कर मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग असणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी त्याची संघात निवड झाली नव्हती. एनसीएमध्ये तो सतत त्याच्या दुखापतीवर काम करत आहे. गेल्या काही दिवसांपासून बोलले जात होते की, तो शेवटच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये बुमराह पुनरागमन करू शकेल. मात्र आता ते शक्य नाही.

टेलीग्राफच्या वृत्तानुसार, वर्षाच्या उत्तरार्धात एकदिवसीय विश्वचषक होणार असल्याने, भारतीय थिंक टँकने कसोटी मालिकेत बुमराहाबाबत धोका न पत्करण्याचा निर्णय घेतला आहे. कसोटी मालिकेत भाग घेण्याऐवजी बुमराहला दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी काही वेळ दिला जाऊ शकतो.

हेही वाचा – IND vs AUS 1st Test: पुजाराचा नवा अवतार टीम इंडियाला पडला महागात; चेतेश्वर बाद होताच भडकला रोहित शर्मा, पाहा VIDEO

यासोबतच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यांनंतर खेळल्या जाणाऱ्या वनडे मालिकेत जसप्रीत बुमराह खेळण्याची शक्यता नाही. कारण याबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेतला जाईल, असेही अहवालात म्हटले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १७ ते २२ मार्च दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे.

हेही वाचा – IND vs AUS 1st Test: टिकाकारांच्या रडारवर असलेल्या राहुलला हरभजनचा सल्ला; म्हणाला, तू फक्त ‘हे’ कर

टेलिग्राफच्या वृत्तानुसार, एका सूत्राने सांगितले की, ”बुमराह गेल्या काही दिवसांपासून एनसीएमध्ये संपूर्ण गोलंदाजी सत्रातून जात आहे. त्याने चांगली कामगिरी केली आहे. दुस-या दिवशीही कडकपणा आला नाही, हीच तिच्यासाठी सर्वात उत्साहवर्धक गोष्ट आहे. अहवालात पुढे असे म्हटले आहे की २९ वर्षीय बुमराह एनसीएमध्ये पांढऱ्या चेंडूने गोलंदाजी करत आहे. हे चांगले लक्षण आहे की ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मालिकेतील शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी त्याचा विचार केला जात नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus indias star bowler jasprit bumrah has been ruled out of the border gavaskar trophy vbm
Show comments