भारताविरुद्ध घरच्या मालिकेत मानहानीकारक पराभव स्विकारावा लागलेल्या ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध पहिला टी-२० सामना मोठ्या दिमाखात जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने २ टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आजचा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाला मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. मात्र याआधीच ऑस्ट्रेलियन संघाचा महत्वाचा खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. सरावादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे केन रिचर्डसन पुढील सामन्यांमध्ये खेळू शकणार नाहीये. ऑस्ट्रेलियन संघाचे फिजीओ डेव्हिड बिक्ली यांनी ही माहिती दिली.

अँड्रू टायची रिचर्डसनच्या जागी संघात निवड करण्यात आली आहे. आजचा टी-२० सामना झाल्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये ५ वन-डे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

Story img Loader