Irfan Pathan on Sanju Samson: भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज संजू सॅमसन ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळवू शकला नाही. आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषक संघातून वगळलेल्या सॅमसनला विश्वचषकापूर्वी होणाऱ्या भारताच्या अंतिम द्विपक्षीय मालिकेत संधी मिळाली नाही. याबाबत माजी स्टार अष्टपैलू इरफान पठाणने संजूला स्थान न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी आपल्या संघाची घोषणा केल्यानंतर ट्वीटरवर म्हटले आहे की, “जर मी संजू सॅमसनच्या जागी असलो असतो तर मी खूप निराश झालो असतो.” पठाणच्या या ट्वीटरवर वरील पोस्टमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. “श्रेयस अय्यरमुळे नेहमीच संजूवर अन्याय झाला,” असे त्याचे चाहते नेहमीच आरोप करत असतात.

वेस्ट इंडिज मालिकेतील शेवटच्या एकदिवसीय सामन्यात आक्रमक अर्धशतक झळकावणाऱ्या सॅमसनला भारतीय फलंदाजीच्या क्रमवारीत आपले स्थान पक्के करता आले नाही. के.एल. राहुल आणि श्रेयस अय्यर दुखापतीतून परतल्यामुळे आणि इशान किशन उत्कृष्ट फॉर्ममध्ये असल्यामुळे सॅमसनला भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नाही. बीसीसीआयने संघाची घोषणा केल्यानंतर सॅमसनने स्वतः इन्स्टाग्रामवर एक क्रिप्टिक स्मायली इमोजी पोस्ट केली आहे. पोस्टवर आतापर्यंत २३ हजार प्रतिक्रिया आणि २.५ हजार कमेंट्स आल्या आहेत. सॅमसनच्या बाबतीत नेहमीच चाहते आणि तज्ञांमध्ये वेगवेगळी मते आहेत, ज्यामुळे खूप चर्चा होत असते.

संजू सॅमसनने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये काय म्हटले होते?

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने आशिया चषक २०२३ स्पर्धा जिंकली. आता ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. मात्र, या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत रोहितसह विराट कोहली, हार्दिक पांड्या यांना विश्रांती देण्यात आली आहे. या मालिकेसाठी पुन्हा एकदा भारताचा विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसनला संघात स्थान मिळाले नाही. बीसीसीआयच्या घोषणेनंतर लगेचच, सॅमसनच्या चाहत्यांनी आपली निराशा व्यक्त केली. आज संजूने इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो पोस्ट केला आणि लिहिले की,“जे आहे ते असे आहे! मी यापुढे अजून प्रयत्न करत राहीन. सध्या मला तोच पर्याय योग्य वाटतो आणि तो मी निवडला आहे.”

हेही वाचा: Dhanashree Verma: युजवेंद्र चहल नाही तर त्याची पत्नी धनश्री होणार वर्ल्डकप २०२३चा ​​भाग; कसे ते, जाणून घ्या

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी टीम इंडिया

के.एल. राहुल (कर्णधार आणि यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर. अश्विन, आर. , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वन डेसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus irfan pathans statement said if i were sanju samson i would be very disappointed avw