IND vs AUS Commentator Isa Guha Apologized to Jasprit Bumrah: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियामध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे. त्याने तिसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत एकट्याने ऑस्ट्रेलियाच्या अर्ध्या संघाला तंबूत धाडले. पण या कसोटीदरम्यान बुमराहवर वर्णभेदात्मक टिप्पणी करण्यात आली. गाबा कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू आणि फॉक्स स्पोर्ट्सची समालोचक इसा गुहा हिने त्याच्यावर जातीय टीका केली. यानंतर हे प्रकरण चांगलेच तापले, त्यामुळे आता या महिला समालोचकाने बुमराहची माफी मागितली आहे.

इसा गुहाने समालोचन करताना बुमराहसाठी प्राइमेट हा शब्द वापरला होता, ज्याचा अर्थ माकड असाही होतो. गाबा कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच ईसा गुहाने माफी मागितली. ती म्हणाली, “रविवारी समालोचन करताना मी एक शब्द वापरला, ज्याचे अनेक अर्थ आहेत. सर्वप्रथम मी माफी मागते. जर मी काही चुकीचं बोलली किंवा कोणाला दुखावले असेल तर माफी मागते. मी सर्वांचा आदर करते, जर तुम्ही कॉमेंट्री संपूर्ण ऐकलीत तर तुमच्या लक्षात येईल की मी भारताच्या महान खेळाडूचे कौतुक करत होती.”

हेही वाचा – IND vs AUS: पुन्हा मंकीगेट प्रकरण? जसप्रीत बुमराहवर महिला कमेंटेटरने केली वर्णभेदात्मक टिप्पणी, गाबा कसोटीत नव्या वादाला फुटलं तोंड

इसा गुहा पुढे म्हणाली, “मी समानतेवर विश्वास ठेवते. मी फक्त बुमराहच्या यशाबद्दल आणि त्याच्या कामगिरीबद्दल बोलत होती. मी कदाचित त्यासाठी चुकीचा शब्द वापरला असेल, ज्यासाठी मी माफी मागते.”

बुमराहबद्दल नेमकं काय म्हणाली होती इसा गुहा?

ब्रेट लीने बुमराहचं कौतुक करत वक्तव्य केलं होतं. यावर इसा गुहा बोलताना म्हणाली की, ‘तो MVP आहे, नाही का? सर्वात मौल्यवान प्राइमेट, जसप्रीत बुमराह. साधारणपणे MVP म्हणजे सर्वात मौल्यवान खेळाडू. पण ईसा गुहा यांनी कॉमेंट्री करताना प्राइमेट हा शब्द वापरला होता. खरं तर, एक प्रकारे, प्राइमेट्सला माकड म्हणतात.

हेही वाचा – WPL Auction मध्ये धारावी झोपडपट्टीत राहणाऱ्या वायरमनच्या लेकीवर कोटींची बोली, ठरली सर्वात महागडी खेळाडू

कोण आहे इसा गुहा?

इसा गुहा ही इंग्लंडची माजी वेगवान गोलंदाज आहे, जिने वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने इंग्लंडकडून ८ कसोटीत २९ विकेट घेतले. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिच्या नावावर ८३ वनडेमध्ये १०१ विकेट आहेत. तिने टी-२० मध्ये १८ विकेट्स आपल्या नावे केले आहेत. ईसा गुहा ही सध्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट महिला समालोचकांपैकी एक आहे. ती जगभरातील प्रत्येक मोठ्या लीग आणि मालिकांमध्ये समालोचन करताना दिसते.

Story img Loader