Jasprit Bumrah Racial Comment by Commentator Isa Guha: भारत वि ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने धावांचा डोंगर उभारला आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियन संघ ७ विकेट गमावून ४०५ धावांवर खेळत आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान असे काही घडले, ज्यामुळे गाबा कसोटीत नवा वाद निर्माण झाला आहे. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहवर लाइव्ह टीव्हीवर जातीय टिप्पणी करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या मालिकेत जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. या मालिकेत तो आघाडीचा विकेट चटकावणार खेळाडू आहे. बुमराहने आतापर्यंत तिसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेतले आहेत. दरम्यान, इंग्लंडची माजी क्रिकेटर आणि फॉक्स स्पोर्ट्स समालोचक ईशा गुहा हिने जसप्रीत बुमराहबाबत अशी काही टिप्पणी केली आहे की त्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे.

हेही वाचा – हेड-स्मिथच्या शतकाने भारताला गाबा कसोटीत टाकलं बॅकफूटवर, ऑस्ट्रेलियाने पहिल्याच डावात उभारला धावांचा डोंगर

u

दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात जसप्रीत बुमराहने भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्याने ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली बुमराहच्या या दमदार स्पेलने प्रभावित झाला आणि फॉक्स क्रिकेटसाठी समालोचन करताना तो म्हणाला, ‘बुमराह, आज ५ षटकांमध्ये २ विकेट घेत फक्त ४ धावा दिल्या आहेत तर, माजी कर्णधाराकडून तुम्हाला हेच हवे आहे.’

हेही वाचा – IND vs AUS: ट्रॅव्हिस हेडचा गाबा कसोटीत मोठा विक्रम, १४७ वर्षांच्या कसोटी इतिहासात कोणालाच जमलं नाही ते करून दाखवलं

यावेळी ब्रेट लीबरोबर इंग्लंडची माजी क्रिकेटर इसा गुहाही समालोचन करत होती. ब्रेट लीला उत्तर देताना ती म्हणाली, ‘तो MVP आहे, नाही का? सर्वात मौल्यवान प्राइमेट, जसप्रीत बुमराह. साधारणपणे MVP म्हणजे सर्वात मौल्यवान खेळाडू. पण ईसा गुहा यांनी कॉमेंट्री करताना प्राइमेट हा शब्द वापरला होता. खरं तर, एक प्रकारे, प्राइमेट्सला माकड म्हणतात. सस्तन प्राण्यांच्या उत्क्रांती अवस्थेत, प्राइमेट्सचा काळ देखील होता.

इसा गुहा यांनी अशा प्रकारची टिप्पणी केल्यानंतर मोठ्या वादात सापडले आहे. २००८ मध्ये असंच घडलेलं मंकीगेट प्रकरण आजही क्रिकेट चाहते विसरलेले नाहीत. त्यावेळेस हरभजन सिंगवर ऑस्ट्रेलियाचा अनुभवी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सने त्याला माकड म्हणत वांशिक शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता. यानंतर हरभजनवरही काही सामन्यांची बंदी घालण्यात आली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus isa guha racial comment on jasprit bumrah during gabba test called him primates bdg