इंदोरच्या खेळपट्टीबाबत आतापर्यंत अनेक दिग्गज खेळाडूंची विधाने समोर आली आहेत. त्याचवेळी भारताचा माजी सलामीवीर कृष्णमाचारी श्रीकांतने केएल राहुलबाबत मोठे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की, “मी केएल राहुलसाठी खूप आनंदी आहे. खरं तर, भारताचा माजी खेळाडू श्रीकांत आनंदी आहेत कारण राहुल इंदोर कसोटीत खेळला नाही कारण अशा खेळपट्टीवर कोणत्याही फलंदाजाला धावा काढणे कठीण होते.”

इंदोरच्या होळकर स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना बराच वादग्रस्त ठरला होता. या सामन्याचा निकाल अवघ्या अडीच दिवसांत लागला, ज्यात भारतीय संघाचा ९ विकेट्सने पराभव झाला. सामना संपल्यानंतर, ICC ने इंदोरची खेळपट्टी अत्यंत खराब असल्याचे सांगून तीन डिमेरिट गुण दिले, जे पाच वर्षांसाठी वैध असतील. पहिल्या दोन कसोटीत खराब कामगिरी करणाऱ्या केएल राहुलला या कसोटी सामन्यात वगळण्यात आले. आता केएल राहुलबाबत माजी भारतीय क्रिकेटपटू श्रीकांत म्हणाले की, “जर राहुल इंदोर कसोटी सामना खेळला असता आणि अपयशी ठरला असता तर त्याचे क्रिकेट करिअर संपले असते.”

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
BCCI Vice President Rajeev Shukla statement on Gautam Gambhir Rohit Sharma sports news
गंभीर, रोहितमध्ये मतभेद नाहीत!‘बीसीसीआय’चे उपाध्यक्ष राजीव शुक्लांचे वक्तव्य
He should focus on his batting and not hairstyle Adam Gilchrist slams Shubman Gill his failures
Shubman Gill : ‘हेअरस्टाइलवर नव्हे तर फलंदाजीवर लक्ष दे…’, अ‍ॅडम गिलख्रिस्टने ‘या’ भारतीय फलंदाजाला फटकारले
Jasprit Bumrah : Kapil Dev shoots down 1983 World Cup teammates controversial take on Bumrah's workload
Jasprit Bumrah : ‘बुमराहशी माझी तुलना करू नका…’, वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे वर्कलोड मॅनेजमेंटबाबत मोठं वक्तव्य
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal : “केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही, दोघेही…”; राहुल गांधींच्या टीकेला आप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Virat Kohli Didnt Liked Ambati Rayudu Robin Uthappa Reveals 2019 World Cup Team Selection
Robin Uthappa on Virat Kohli: “विराटला तो आवडत नव्हता”, स्फोटक फलंदाजाला २०१९ च्या वर्ल्डकप संघातून वगळण्याबाबत रॉबिन उथप्पाचा मोठा खुलासा

हेही वाचा: International Crush: सुंदर मुखकमलावर मोहक हास्य! WPLच्या पहिल्याच सामन्यात ‘ही’ खेळाडू बनली भारतीयांची नवीन इंटरनॅशनल क्रश

केएल राहुल या खेळपट्टीवर खेळला नाही ही चांगली गोष्ट आहे – श्रीकांत

भारताचा कर्णधार असलेला श्रीकांत पुढे म्हणाले की, “जर केएल राहुल इंदोरमध्ये खेळला असता आणि त्याने तेथे धावा केल्या नसत्या तर त्याचा आत्मविश्वास आणखी खाली गेला असता. त्यामुळे तो या कसोटी सामन्याचा भाग नव्हता याचा मला आनंद आहे. श्रीकांतने त्याच्या यूट्यूब शोमध्ये हे सांगितले. भारतीय खेळाडू केएल राहुलबद्दल बोलताना टीम इंडियाचा माजी सलामीवीर श्रीकांत म्हणाला की, “सर्वप्रथम मी केएल राहुलसाठी खूप आनंदी आहे. तो खेळला नाही ही चांगली गोष्ट आहे कारण तो अशा खेळपट्टीवर खेळला असता आणि पुढच्या दोन कसोटीत धावा केल्या नसत्या तर त्याची कारकीर्द संपली असती. म्हणूनच तो चांगला आहे, तो खेळला नाही.”

अशा खेळपट्टीवर फलंदाजी करणे खूप अवघड असते, असे मी स्पष्टपणे सांगत आहे. फलंदाजी कोणाचीही असो, ते अवघड झाले असते. तो कोणीही असो, विराट कोहली असला तरी अशा खेळपट्टीवर कोणीही धावा करू शकत नाही. अशा परिस्थितीत केएल राहुलने आपल्या करिअरसाठी न खेळणे योग्यच होते.

हेही वाचा: Sanjana Ganesan: जसप्रीत बुमराह लवकरच बाबा होणार? WPL २०२३ दरम्यान संजना गणेशनच्या व्हायरल फोटोंमुळे चर्चेला उधाण

अशा खेळपट्टीवर फलंदाज अपयशी ठरतील – के श्रीकांत

भारताचा माजी फलंदाज कृष्णमाचारी श्रीकांतनेही इंदोरच्या खेळपट्टीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्याबद्दल निराशा व्यक्त केली. होळकर स्टेडियमच्या खेळपट्टीला आयसीसीकडून खराब रेटिंग मिळाले आहे. इंदोर कसोटीबद्दल बोलताना श्रीकांत म्हणाला की, “अशा खेळपट्टीवर फलंदाज अपयशी ठरतात, कारण अशी खेळपट्टी कसोटी क्रिकेटसाठी चांगली नसते.”

चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यांमधील खेळपट्टीबद्दल बोलताना श्रीकांत म्हणाला की, ती कसोटी क्रिकेटसाठी कुठेही चांगली नाही. त्याने आठवण करून दिली की २००८ मध्ये आपण टर्निंग ट्रॅक तयार केला नव्हता, परंतु तरीही भारताने कसोटी मालिका आरामात जिंकली. कसोटी क्रिकेटसाठी हे अजिबात चांगले नाही आणि आपण चूक करत असल्याचे त्याने म्हटले आहे. २००८ ची ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका पाहिल्यास, खेळपट्ट्या टर्नर नव्हत्या, पण भारताने २-०ने जिंकली. यावेळी चेंडू आधीच वळत असल्याने या खेळपट्ट्यांवर फलंदाजी करणे कठीण आहे.

Story img Loader