Captain Rohit Sharma on Ravi Shastri: भारतीय कर्णधार रोहित शर्माने माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या टिप्पणीला ‘बकवास’ असे संबोधले, ज्यात रवी शास्त्री यांनी म्हटले होते की, अतिआत्मविश्वासामुळे भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंदोर कसोटी सामन्यात पराभव झाला होता. शास्त्री २०१४ नंतर सातपैकी ६ वर्षे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. तिसर्‍या कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून भारताच्या ९ गडी राखून झालेल्या पराभवावर भाष्य करताना ते म्हणाले की, “भारतीय संघ थोडा आत्मसंतुष्ट आणि अतिआत्मविश्वासाने ग्रस्त होता, जिथे त्यांनी गोष्टी गृहीत धरल्या.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कर्णधार रोहित शर्मा रवी शास्त्रीवर संतापला

कर्णधार रोहितने गेल्या १८ महिन्यांत शांतता, संयम आणि सन्मान राखला आहे, परंतु तिसऱ्या कसोटी सामन्याबाबत माजी प्रशिक्षकाच्या मूल्यांकनाबाबत विचारले असता, त्याने जोरदार उत्तर दिले. चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला रोहित म्हणाला, “खर सांगू, जेव्हा तुम्ही दोन सामने जिंकता तेव्हा बाहेरच्या लोकांना वाटते की आम्ही अतिआत्मविश्‍वासात आहोत. हा पूर्णपणे शुद्ध मूर्खपणा आहे, कारण तुम्हाला चारही सामन्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करायची असते दोनमध्ये चागंले खेळलो आणि एका सामन्यात हरलो तर लगेच टीका करणारे आपले मत मांडायला मोकळे होतात. त्यांना बोलायला काय जात जो खेळतो त्याला माहिती असत, बाकीचे फक्त बोलण्यापुरता असतात.”

हेही वाचा: Jasprit Bumrah: होळीच्या दिवशी टीम इंडियाला मिळाली आनंदाची बातमी, जसप्रीत बुमराहवरील शस्त्रक्रिया यशस्वी

या प्रकरणाबाबत त्याने जाहीरपणे ‘मूर्खपणा’ असे प्रत्युतर दिले

रोहित म्हणाला, “दोन सामने जिंकल्यानंतर थांबायचे नाही. हे तितकेच सोपे आहे. नक्कीच हे सर्व लोक जेव्हा अतिआत्मविश्वासाबद्दल बोलतात आणि विशेषत: जेव्हा ते ड्रेसिंग रूमचा भाग नसतात तेव्हा ड्रेसिंग रूममध्ये कोणत्या प्रकारची चर्चा झाली हे त्यांना माहित नसते.” अशा व्यक्तीसाठी रोहितचे उत्तर. जो अलीकडेपर्यंत प्रमुख होता. संघाचे रणनीतीकार तो अशा पद्धतीने विधानं करतो हे शुद्ध मूर्खपणाचे लक्षण आहे.”

हेही वाचा: INDvsAUS: इशान किशन कसोटी पदार्पण करणार की केएस भरतला पुन्हा संधी मिळणार; द्रविडने दिले संकेत, कोण असेल यष्टीरक्षक?

या गोष्टीवरून रोहित शर्मा भडकला

भारतीय कर्णधार म्हणाला, “आम्हाला सर्व सामन्यांमध्ये आमचे सर्वोत्तम द्यायचे आहे आणि जर तो अतिआत्मविश्वास किंवा बाहेरच्या व्यक्तीला असे काही वाटत असेल तर आम्हाला काही फरक पडत नाही.” “या ड्रेसिंग रूममध्ये रवी स्वतः होते.” रोहित रवी शास्त्रींबद्दल पुढे म्हणाला की, “तो एकदिवसीय सामन्यांचा भाग आहे आणि जेव्हा आपण खेळतो तेव्हा आपली मानसिकता कशी असते हे त्याला माहीत आहे. हे अतिआत्मविश्वास नसून निर्दयी असण्याबद्दल आहे. निर्दयी हा शब्द प्रत्येक क्रिकेटपटूच्या मनात येतो आणि तो परदेश दौऱ्यावर असताना विरोधी संघाला किंचितही संधी न देण्याशी संबंधित आहे. परदेशात गेल्यावर आपल्यालाही तेच वाटतं.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus its complete nonsense statement rohit sharma responds to ravi shastris over confidence comment avw