India vs Australia World Cup Final 2023: विश्वचषक २०२३चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघ २४० धावा करून सर्वबाद झाला होता. खेळपट्टी संथ असेल असे बोलले जात होते. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत भारताच्या पहिल्या डावात सात विकेट्स घेतल्या. यावरून वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीचा काहीसा आधार असल्याचे दिसून आले. अशा परिस्थितीत वेगवान गोलंदाजांना स्विंग आणि सीम मिळाल्याचे या विश्वचषकात दिसून आले आहे. याचा फायदा घेण्यासाठी भारतीय कर्णधार रोहित शर्माने सुरुवातीपासूनच आपल्या स्ट्राईक गोलंदाजांना कामाला लावले. मात्र, विकेट्स न मिळाल्याने जसप्रीत बुमराह निराश झाला आणि त्याने रागाच्या भरात त्याच्या टोपीने स्टंपवरील बेल्स पाडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जसप्रीत बुमराह निराश झाला आणि त्याने रागाच्या भरात त्याच्या टोपीने स्टंपवरील बेल्स पाडली पण नंतर लगेचच त्याने ती परत देखील ठेवली. यातून तो किती रागवला आहे, हे दिसत होते. कर्णधार रोहित शर्माने त्याला जवळ जाऊन त्यानंतर समजावले. त्यावर आता सामनाधिकारी, पंच आणि आयसीसी काय कारवाई करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. बुमराहचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रोहित पहिल्याच षटकात उत्कृष्ट फॉर्मात असलेल्या मोहम्मद शमीला गोलंदाजी देईल असे वाटत होते. मात्र, नेहमीप्रमाणे जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला आणि त्याने पहिल्याच षटकात १५ धावा दिल्या. यानंतर दुसऱ्या षटकात रोहितने प्लॅन बदलला आणि सिराजऐवजी शमीला गोलंदाजी करण्यास सांगितले. शमीने कर्णधाराला निराश केले नाही आणि सामन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर डेव्हिड वॉर्नरला तंबूत पाठवले. त्याने वॉर्नरला कोहलीकरवी झेलबाद केले. तीन चेंडूंत सात धावा करून वॉर्नर बाद झाला. मात्र, या षटकात त्याने १३ धावा खर्च केल्या. याचा फायदा घेत बुमराहने आणखी दोन विकेट्स घेत मिचेल मार्श आणि स्टीव्ह स्मिथला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

भारतीय डाव

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ २४० धावांत सर्वबाद झाला. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक ६६ आणि विराट कोहलीने ५४ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने ४७ आणि सूर्यकुमार यादवने १८ धावा केल्या. कुलदीप यादवने १० धावांचे योगदान दिले. या पाच खेळाडूंशिवाय कोणीही दुहेरी आकडा गाठू शकला नाही. रवींद्र जडेजा नऊ, मोहम्मद शमी सहा, श्रेयस अय्यर आणि शुबमन गिल प्रत्येकी चार धावा करून बाद झाले. जसप्रीत बुमराहला एकच धाव करता आली. मोहम्मद सिराज नऊ धावा करून नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. ग्लेन मॅक्सवेल आणि अ‍ॅडम झाम्पाने प्रत्येकी एक विकेट घेतली.

हेही वाचा: IND vs AUS Final: २०२३ विश्वचषकात टीम इंडिया पहिल्यांदाच झाली सर्वबाद, काय सांगते आकडेवारी? जाणून घ्या

भारतासाठी या सामन्यात विराट कोहली आणि के.एल. राहुल यांनी चौथ्या विकेटसाठी ६७ धावांची सर्वात मोठी भागीदारी केली. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी केली. रोहित, कोहली आणि राहुलला चांगली सुरुवात मोठ्या डावात करता आली नाही. श्रेयस अय्यर, शुबमन गिल, सूर्यकुमार मोठ्या क्षणी अपयशी ठरले. या विश्वचषकात भारत प्रथमच सर्वबाद झाला आहे. आता संपूर्ण जबाबदारी गोलंदाजांवर आहे. त्याच्याकडून धोकादायक गोलंदाजीची अपेक्षा आहे. मोहम्मद शमीने या स्पर्धेत आतापर्यंत २३ विकेट्स घेतल्या आहेत. उपांत्य फेरीत त्याने सात विकेट्स घेतल्या.

अंतिम फेरीत भारताचा पराभव झाला

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ ५० षटकांत २४० धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाने ४३ षटकात ४ विकेट्स गमावत २४१ धावा करत सामना जिंकला. कांगारू संघासाठी ट्रॅव्हिस हेडने १४१ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. लाबुशेनने नाबाद ५८ धावा केल्या. मिचेल मार्श १५ धावा केल्यानंतर, डेव्हिड वॉर्नर सात धावा करून, स्टीव्ह स्मिथ चार धावा करून बाद झाला. ग्लेन मॅक्सवेलने नाबाद ५१ धावा केल्या.

ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता ठरला आहे. त्याचवेळी भारताचे तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले. या स्पर्धेत सलग १० सामने जिंकले, मात्र ११व्या सामन्यात संघ मागे पडला. भारताला दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखालील संघाचा शेवटचा पराभव २००३ मध्ये झाला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus jasprit bumrah gets frustrated during the match throws bells on the stumps in anger watch the video avw