IND vs AUS, World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषकातील पहिला सामना भारताला जिंकून देण्यात के.एल. राहुलने महत्त्वाची भूमिका बजावली. राहुलने विराट कोहलीसोबत चौथ्या विकेटसाठी १६५ धावांची भागीदारी करत संघाला विजयापर्यंत नेले. त्याने षटकार मारून सामना पूर्ण केला. यादरम्यान, त्याने ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ९७* (११५) धावांची नाबाद खेळी खेळली. राहुलची ही खेळी पाहून भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेने त्याचे कौतुक केले आणि म्हटले की, “तो त्याच्या खऱ्या रंगात परतला आहे.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘ईएसपीएनक्रिकइन्फो’ वर बोलताना अनिल कुंबळे म्हणाला, “आम्ही पाहिल्याप्रमाणे के.एल. राहुल आता तू तुझ्या खऱ्या रंगात परतला आहे. तो मैदानावर काय करू शकतो हे आम्हाला माहीत आहे. कोणत्याही खेळपट्टीवर त्याचे कौशल्य, फलंदाजी तंत्र, त्याची फिरकी गोलंदाजी खेळण्याची क्षमता आणि वेगवान गोलंदाजीवर फटके खूप प्रभावी आहेत. त्याची फलंदाजीतील सातत्य हे भारतासाठी सध्या खूप महत्वाचे आहे. सध्या तो खूप आश्चर्यकारक कामगिरी करत आहे.”

हेही वाचा: World Cup 2023: राशिद खानने दाखवले मोठे मन, वर्ल्डकप सुरु असताना देशवासीयांसाठी केली खास घोषणा

माजी दिग्गज क्रिकेटपटू अनिल कुंबळे पुढे म्हणाले की, “राहुलला त्याची भूमिका चांगलीच समजते. त्याला त्याचे संघातील रोल चांगलेच माहीत आहे. त्याच्याकडे फिरकी खेळण्याची उत्तम क्षमता आहे. मधल्या फळीतील फलंदाज म्हणून तुम्हाला ही गोष्ट हवी आहे. के.एल. राहुल, विराट कोहली आणि इतर फलंदाजांमध्ये चेंडूला चांगला फटका मारण्याचे कौशल्य आहे. ५० षटकांमध्ये केवळ षटकार आणि चौकार मारणे गरजेचे नसते तर सामन्यातील त्याक्षणी दबाव तुम्ही कसा सहन करतात आणि परिस्थितीनुसार बदल करून पुढे जातात हे फार महत्वाचे आहे.”

माजी लेगस्पिनर कुंबळे पुढे म्हणाला, “के.एल.ने चांगली कामगिरी केली आहे. यामुळे संघाच्या अनेक अडचणी दूर झाल्या आहेत. त्या परिस्थितीत त्याने घेतलेला अनुभव आणि शेवटपर्यंत तिथे टिकून राहणे हे भारतासाठी खरोखरच चांगले लक्षण आहे. विश्वचषक जिंकण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे, हे यातून दिसते.”

हेही वाचा: IND vs AUS: विराट कोहलीच्या झेल सोडल्यावर अश्विनने केला खुलासा; म्हणाला, “मी एकाच जागेवर बसून…”

यावर्षी एकदिवसीय सामन्यात लोकेश राहुलचा फॉर्म जबरदस्त आहे

लोकेश राहुलने २०२३मध्ये आतापर्यंत १३ एकदिवसीय डावात फलंदाजी केली आहे, ज्यामध्ये त्याने ७८.५०च्या सरासरीने ६२८ धावा केल्या आहेत. या काळात त्याने एक  शतक आणि ५ अर्धशतके केली आहेत. ऑस्ट्रेलियाचा डाव १९९ धावांत गुंडाळल्यानंतर भारतीय संघ सहज जिंकेल, असे वाटत होते, मात्र तसे झाले नाही. ऑस्ट्रेलियाने जोरदार पुनरागमन केले आणि पहिल्या दोन षटकांत दोन धावांत तीन विकेट्स गमावल्या. कर्णधार रोहित शर्मा, इशान किशन आणि श्रेयस अय्यर खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. मात्र, राहुलने डावाची सर्व सूत्रे हाती घेत भारताला विजय मिळवून दिला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus kl rahul is able to bat so well because of this anil kumble told the big reason avw