४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने २-१ अशी आघाडी घेतल्यानंतर आज सिडनी कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. भारतीय संघाने अंतिम ११ जणांच्या संघात फॉर्मात नसलेल्या लोकेश राहुलला पुन्हा एकदा संधी देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. मात्र या सामन्यातही लोकेश राहुलच्या अपयशाची मालिका सुरुच राहिली आहे. अवघ्या ९ धावांवर असताना जॉश हेजलवूडने त्याला स्लिपमध्ये उभ्या असलेल्या शॉन मार्शकडे झेल द्यायला भाग पाडत, माघारी धाडलं.

राहुल बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर नेटीझन्सची पुन्हा एकदा त्याची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे.

Story img Loader