Mark Waugh on air spat with Dinesh Karthik: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात स्पर्धा असेल तर शाब्दिक युद्धाची अनेक प्रकरणे ऐकायला मिळतात. सहसा खेळाडूंमध्ये स्लेजिंगचे किस्से ऐकायला मिळतात, पण बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटीत समालोचकांमध्ये भांडण झाले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दिल्लीत झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही ऑस्ट्रेलियाची खराब कामगिरी पाहायला मिळाली आणि या कसोटीतही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑस्ट्रेलियाच्या खराब कामगिरीवर भाष्य करताना माजी कर्णधार मार्क वॉने भारतीय यष्टीरक्षक दिनेश कार्तिक या दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. हे सर्व घडले जेव्हा चेतेश्वर पुजारा फलंदाजी करत होता आणि स्ट्राईकवर असताना ऑस्ट्रेलियन कर्णधाराने सेट केलेल्या क्षेत्ररक्षणामुळे मार्क वॉ खूप निराश दिसत होता. खरे तर ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज खेळाडू वॉ आपल्या संघाच्या खराब कामगिरीमुळे संतापला होता. इतकंच नाही तर ऑस्ट्रेलियाची सेट फिल्डिंग पाहून त्याचा पारा आणखीनच भडकला होता. दोघांची द्वंद पाहून समालोचक संजय मांजरेकर तणावात पडले.

दोन्ही संघांचे खेळाडू मैदानावर उत्साह दाखवत होते आणि दोन्ही संघांमध्ये लढत झाली, तर कॉमेंट्री बॉक्समध्ये डीके आणि मार्क वॉ एकमेकांशी भांडताना दिसले. विजयासाठी ११४ धावांचा पाठलाग करताना भारताची धावसंख्या ३१/१ अशी होती आणि त्यानंतर चेतेश्वर पुजाराने उभारलेल्या क्षेत्ररक्षणामुळे वॉचा अडथळा वाढला. यादरम्यान वॉ ऑन एअर म्हणाला, “खर सांगू, मला या क्षेत्ररक्षणाने आश्चर्य वाटले. तुझ्याकडे मिड-ऑफ नाही यावर माझा विश्वास बसत नाही. १०० च्या आसपास तुझ्याकडे काही धावा आहेत, समोर पुजारा धावांसाठी धडपडत असताना, तो पॅडसह चेंडू ऑफ साइडला मारतो आणि तुम्ही तिथे खेळाडू ठेवतच नाही. अर्थातच तुम्ही बॅट पॅड ऑफ साइडवर ठेवून त्याला बाद करू शकला असतात.”

हेही वाचा: PSL: पाकिस्तान सुपर लीग वादाच्या भोवऱ्यात; तीन फ्रँचायझींची सट्टेबाजी करणाऱ्या कंपन्यांशी हातमिळवणी, PCBवर प्रश्नचिन्ह

नेमकं काय झाला दोघांमध्ये पाहा

वॉची ही कमेंट ऐकून कार्तिकने एंट्री घेत वॉवर प्रश्नांचा भडीमार केला आणि शेवटी या वादाला आणखी वेग आल्याचे दिसून आले. दोघांमध्ये कोणत्या प्रकारची वादावादी झाली ते पाहूया.

कार्तिक: “मला माहित आहे की तू फील्ड सेटवर खूश नाहीस, चल – तू कशाबद्दल बोलत आहेस?”

वॉ: “मला ऑफ-साइडवर बॅट पॅडसाठी खेळाडू हवा आहे आणि सिलीपॉइंट वर देखील एक हवा आहे जो कोचिंग कव्हरसारखा तिथे राहू शकतो, पुजाराला बाद करण्यासाठी ते एक चांगले क्षेत्ररक्षण असेल.” पुजाराचा पुढचा शॉट पॉइंटवरून जाताच वॉ आणखीनच भडकला होता.

कार्तिक: “मार्क, जर तुमचा पॉइंट तिथे असता तर चेंडू सीमारेषेवर गेला असता. कारण पुजाराकडे तेवढे स्कील आहे.

वॉ: ” तुझा मुद्दा चुकीचा आहे, चेंडू थेट त्याच्या हातात गेला असता कारण तो थर्टीयार्ड वर्तुळात जाईल.”

कार्तिक: “तुम्हाला वाटत नाही की त्याने गॅप शोधला असता? कारण त्याच्याकडे शॉट मारण्यासाठी भरपूर वेळ होता.”

वॉ: “आम्ही ऑसी साहजिकच वेगळा विचार करतो पण जर मी पुजाराविरुद्ध खेळत असेल तर मला बॅट-पॅड ऑफ साइडला हवा आहे कारण मला वाटते की त्याला बाद करण्याची मोठी संधी होती.”

कार्तिक: “पण ही फिल्डिंग रोहित शर्मासाठी चालेल का?, त्याबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही?”

वॉ: “मी रोहित शर्माबद्दल बोलत नाही. डीके तो पूर्णपणे वेगळा खेळाडू आहे.”

कार्तिक: “म्हणजे तुम्ही क्षेत्ररक्षणावर खूश आहात? रोहित शर्मासाठी कोणतीच फिल्डिंग उपयोगाची नाही, तुला ते ठीक वाटते? कर्णधार म्हणून तू तेच करशील का?”

वॉ: “मला माहित नव्हते की ही पत्रकार परिषद होती.”

कार्तिक: “थोडा विनोद आहे.”

वॉ: “मी तुमचे प्रश्न प्रति सत्र मर्यादित ठेवणार आहे, तुम्हाला प्रत्येक सत्रात फक्त एक प्रश्न मिळेल, ठीक आहे? त्यापेक्षा जास्त नाही.”

दोघांमधील वाद पाहून सहकारी समालोचक संजय मांजरेकर यांना तणाव जाणवला आणि त्यांनी तत्काळ हस्तक्षेप केला आणि परिस्थिती शांत केली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus mark waugh karthik clashed in the match manjrekar got tension after seeing the fight avw