IND vs AUS Highlight: भारत-ऑस्ट्रेलिया तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना जिंकून भारतीय संघाने पुन्हा क्रिकेटप्रेमींच्या आशा पल्लवीत केल्या आहेत. भारताच्या बिथरलेल्या गोलंदाजांच्या फळीला बुमराहच्या वापसीने मोठा आधार मिळाला. ऑस्ट्रेलियाला अवघ्या ९० धावांवर रोखल्यावर रोहित शर्माने आक्रमक खेळी दाखवून ४६ धावा केल्या. भारताला सहा गडी राखून विजय मिळाल्यावर आता गुणतालिकेत भारत व ऑस्ट्रेलिया दोघांकडे १-१ गुण आहे. रोहितचा कालचा सामना हा खऱ्या अर्थाने यशस्वी ठरला त्यामुळे त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत मात्र यातील दिनेश कार्तिकीसह टिपलेला एक क्षण सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

तुम्हाला आठवत असेल भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या सामन्यात भर मैदानातच रोहितने दिनेशचा गळा धरल्याचे काही फोटो व्हायरल झाले होते. या सामन्यात भारतीय गोलंदाजांना काही केल्या सामन्याचा सूर गवसत नव्हता अशावेळी अक्षर पटेलने ११ व्या शतकात घेतलेल्या विकेटनंतर पुन्हा जिंकण्याची संधी वाटू लागली. यावेळी उमेश यादव गोलंदाजी करताना दिनेश कार्तिकने स्टेवन स्मीथला झेलबाद केले मात्र पंचांनी बाद न दिल्याने भारताला रिव्ह्यू घ्यावा लागला जो नंतर भारताच्या बाजूने आला. याच षटाकात ग्लेन मॅक्सवेलला झेलबाद करतानाही हाच गोंधळ झाला. या दोन्हीवेळी दिनेश कार्तिक काहीसा घाबरलेला दिसत असल्याने रिव्ह्यूबाबत रोहितही संभ्रमित होता म्हणूनच रोहितने गंमतीत दिनेश कार्तिकचा गळा धरला होता.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या सामन्यात रोहितने याच दिनेश कार्तिकचे कौतुक करून त्याला मिठी मारल्याचे काही फोटो आता व्हायरल होताना दिसत आहेत. यावर अनेकांनी कॅप्टन असावा तर असा जो चुकल्यावर ओरडेल व वेळीच कौतुकही करेल. आयुष्यात एक तरी मित्र रोहितसारखा असावा असेही अनेकांनी म्हंटले आहे.

दरम्यान, कालच्या सामन्यात दिनेश कार्तिकने अखेरच्या षटकात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला व लगेच पुढच्या चेंडूवर चौकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. रोहितने अखेरपर्यंत नाबाद राहत ४६ धावांची खेळी केली. रोहितच्या तुफानी फटकेबाजीने भारताला दणदणीत विजय मिळवून दिल्याने त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता.

Story img Loader