दिल्लीचे मैदान भारतीय खेळाडूंनी गाजवले. अरुण जेटली स्टेडिअमवर पार पडलेल्या दुसऱ्या कसोटीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमने-सामने होते. या सामन्यात भारतीय संघाने ६ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने ३६ वर्षात एकदाही दिल्लीत कसोटी सामना न गमावण्याचा विक्रम कायम ठेवला. विशेष म्हणजे, या विजयासह भारताने मालिकेत २-०ने आघाडी घेतली. सामन्यात विराट कोहलीच्या पायचीत (LBW)वरून सुनील गावसकर आणि मार्क वॉ यांच्यात चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पंचांच्या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. पहिल्या दिवसाच्या खेळानंतर भारतीय क्रिकेट संघाने लवकर विकेट गमावल्या पण त्यानंतर अनुभवी फलंदाज विराट कोहलीने भारताचा डाव सांभाळला. विराट कोहली आपल्या घरच्या मैदानावर खेळत होता, तो एक मोठी खेळी खेळत होता, परंतु ४४ धावांच्या वैयक्तिक धावांवर तो वादग्रस्तपणे पायचीत बाद झाला.

हेही वाचा: WTC Team India: दिल्ली कसोटी विजयानंतर WTC समीकरण बदलले! नक्की कोणाच्या डोक्यावर टांगती तलवार? खुद्द ICC नेच दिले उत्तर

मैदानावरील पंच नितीन मेनन यांनी त्याला बाहेर बोलावले. यानंतर कोहलीने डीआरएसचा अवलंब केला. रिप्लेमध्ये असे दिसून आले की चेंडूचा बॅट आणि पॅडशी एकाच वेळी संपर्क झाला. अनेक अँगल पाहिल्यानंतर तिसऱ्या पंचाने मैदानावरील पंचाचा निर्णय मान्य केला आणि विराट कोहलीला बाद घोषित करण्यात आले. या निर्णयावर भारतीय ड्रेसिंग रुम आणि विराट कोहलीसह प्रेक्षकही आश्चर्यचकित झाले होते पण मैदानावरील समालोचकांचे मतही महत्त्वाचे होते.

सुनील गावसकर आणि मार्क वॉ यांच्यात चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले

ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फलंदाज मार्क वॉ याने पंचांच्या निर्णयाचा बचाव केला आहे आणि या संदर्भात भाष्य करताना म्हटले आहे की, “विराट कोहलीला बाद करणे हा पंचाचा धाडसी निर्णय होता. १० पैकी नऊ वेळा तुम्ही नॉट आउट द्याल तर कसं चालेल. या निर्णयावर अनेक शंका उपस्थित झाल्या होत्या पण माझ्यामते थर्ड अंपायर हे बरोबर होते आणि त्यांचे अभिनंदन करतो.”

हेही वाचा: IND vs AUS: “त्याने मलाही खायला लावले पण…”, फिटनेस उत्साही कोहली खरेच खात होता छोले भटुरे? राहुल द्रविडचा रहस्यभेद!

वॉ ला प्रत्युत्तर देताना सुनील गावसकर म्हणाले, “मला वाटत नाही की चेंडू पॅडला लागला होता कारण बॉल ट्रॅकिंगमध्ये स्पष्ट दिसत होते चेंडू हा बॅटला लागला होता. पण तरीही जरी पॅडला लागला असे गृहीत धरले तर चेंडू स्टंपला लागत नव्हता कारण तो अंपायर कॉल होता. कोहलीच्या बॅटला चेंडू लागला की नाही हा प्रश्न होता. जे खूप जवळचे प्रकरण होते. आपल्याला हे लक्षात ठेवायला हवे की त्याला मैदानावर बाद केले गेले. आता तिसऱ्या पंचाला बॉल कोहलीच्या बॅटला लागला की नाही याची पूर्ण खात्री असायला हवी होती. तिसरे पंच आणि नितीन मेनन यांच्या निर्णयावर मी नाराजी व्यक्त करतो ऑस्ट्रेलियाला नाहीतरी हेच हवे होते.” असे म्हणत त्यांनी मार्क वॉ वर टीका केली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus match referee umpire should look into this sunil gavaskar gave a tremendous reply on virat kohlis lbw avw