IND vs AUS Match Highlight: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये १ लाख ३० हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना सुरु झाला आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून गोलंदाजी निवडली होती. भारतीय कर्णधार रोहित शर्माने षटकार- चौकारांसह दणदणीत सुरुवात केली, मात्र सामन्याच्या सुरवातीलाच शुबमन गिलने अवघ्या चार धावा करून आपली विकेट गमावली. पाठोपाठ रोहित शर्मा सुद्धा ४७ धावांवर बाद झाला. मागील दोन सामन्यांमध्ये धमाकेदार शतक करणाऱ्या श्रेयस अय्यरने सुद्धा तिसऱ्याच चेंडूवर अत्यंत महत्त्वपूर्ण विकेट गमावली आहे. भारताची सुरुवात अत्यंत चिंताजनक झाली असली तरी एक योगायोग सध्या भारतीयांसाठी थोडीशी आशा घेऊन येऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावरवर व्हायरल होणाऱ्या एका पोस्टनुसार भारताने आजचा टॉस हरणे हे मागच्या दोन विश्वचषकांच्या रेकॉर्ड्सनुसार फायद्याचं ठरू शकतं. मुफदलाल वोहराने केलेल्या X पोस्टनुसार, भारताने जिंकलेल्या दोन विश्वचषकाच्या अंतिम फेरीच्या वेळी सुद्धा भारताने नाणेफेकीत पराभवच स्वीकारला होता. १९८३ मध्ये व २०११ मध्ये दोन्ही वेळेस भारत नाणेफेकीत हरूनही सामन्यात विजय मिळवला होता.

आज पहिल्याच १५ षटकांच्या आत भारताने तीन विकेट गमावल्या असताना भारतीयांनी हा योगायोग रुपी आशेचा किरण सुद्धा महत्त्वाचा ठरत आहे. अनेकांनी या पोस्ट शेअर करून व कमेंट करून पुन्हा हे असंच घडावं अशी प्रार्थना केली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus match update 1983 and 2011 records for toss give little hope to indians after rohit sharma gill shreyas iyer wicket svs
Show comments