Shubman Gill broke Hashim Amla’s record in ODI cricket: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत शुबमन गिल शानदार फॉर्ममध्ये दिसत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात शुबमन गिलला ७४ धावांवर अॅडम झम्पाने क्लीन बोल्ड केले होते. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्याने दमदार फटकेबाजी करत शतकाचे लक्ष्य पूर्ण केलो. त्याच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीत प्रथमच, गिलने कांगारू संघाविरुद्ध शतक झळकावण्यात यश मिळविले, तर त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील हे सहावे शतक होते. तसेच या खेळीच्या जोरावर हाशिम आमलाचा विक्रम मोडला.
शुबमन गिलने कांगारू संघाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ३७ चेंडूत षटकार ठोकून आपले अर्धशतक पूर्ण केले होते आणि या सामन्यातही त्याने ३७ चेंडूत षटकार ठोकून आपले शतक पूर्ण केले. यानंतर त्याने आपली उत्कृष्ट फलंदाजी कायम ठेवत ९२ चेंडूत शतक पूर्ण केले. आपल्या शतकी खेळीत त्याने ४ षटकार आणि ६ चौकार लगावले. या सामन्यात गिलने ९७ चेंडूत १०४ धावांची खेळी केली.
गिलने आमलाला मागे टाकत रचला इतिहास –
शुबमन गिलने त्याच्या शतकादरम्यान एकदिवसीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३५ डावांनंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिला ठरला. त्याने हाशिम आमलाला मागे सोडले, ज्याने वनडेच्या पहिल्या ३५ डावात १८४४ धावा केल्या होत्या.
पहिल्या ३५ डावांत सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारे फलंदाज –
१९१९ धावा – शुबमन गिल
१८४४ धावा – हाशिम आमला
१७५८ धावा – बाबर आझम<br>१६७९ धावा – रॅसी व्हॅन डर ड्युसेन
१६४२ धावा – फखर जमान
२०२३ मध्ये गिलने झळकावले सातवे शतक –
शुबमन गिलने वर्ष २०२३ मध्ये त्याचे सातवे शतक झळकावले. तो एका वर्षात ५ किंवा त्याहून अधिक शतके झळकावण्यात यशस्वी ठरत, त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत प्रथमच हे केले. यापूर्वी विराट कोहली, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि शिखर धवन यांनी भारतासाठी एका वर्षात पाच किंवा त्याहून अधिक शतके झळकावली आहेत.
हेही वाचा – IND vs AUS 2nd ODI: हिटमॅनला मागे टाकत शुबमन गिल बनला २०२३ चा सिक्सर किंग, जाणून घ्या किती मारलेत षटकार?
एका कॅलेंडर वर्षात भारतासाठी पाच किंवा त्याहून अधिक एकदिवसीय शतके झळकावणारे फलंदाज –
विराट कोहली (२०१२, २०१७, २०१८, २०१९)
रोहित शर्मा (२०१७, २०१८, २०१९)
सचिन तेंडुलकर (१९९६, १९९८)
राहुल द्रविड (१९९९)
सौरव गांगुली (२०००)
शिखर धवन (२०१३)
शुभमन गिल (२०२३)
२०२३ मध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारे फलंदाज –
७- शुबमन गिल
५- विराट कोहली
४ – टेंबा बावुमा
४ – डेव्हॉन कॉन्वे
४ – डॅरिल मिशेल
४ – एन हुसेन शांतो