IND vs AUS 4th Test 4th Day Highlights : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील बॉक्सिंग डे कसोटी मेलबर्नमध्ये खेळली जात आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ९ गडी गमावून २२८ धावा केल्या आहेत. पहिल्या डावाच्या आधारे त्यांच्याकडे १०५ धावांची आघाडी होती. अशा स्थितीत संघाची एकूण आघाडी ३३३ धावांची झाली आहे. स्कॉट बोलंड आणि नॅथन लायन या जोडीने शेवटच्या विकेट्साठी झुंजायला लावले. दरम्यान जसप्रीत बुमराने ४ विकेट्स घेऊन भारताचे सामन्यात पुनरागमन केले आहे.

कांगारुच्या शेपटाने भारताला फोडला घाम –

स्कॉट बोलंड आणि नॅथन लायन या जोडीने ११० चेंडूत दहाव्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी केली आहे. लायन ४१ धावांवर नाबाद असून बोलंड १० धावांवर करुन साथ देत आहे. ऑस्ट्रेलियाला १७३ धावांवर नववा धक्का बसला. यानंतर कांगारुच्या शेपटाने भारताला प्रचंड घाम फोडला आहे. कांगारूंनी पहिल्या डावात ४७४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव रविवारी सकाळीच ३६९ धावांवर आटोपला होता. आता सोमवारी ९८ षटकांचा सामना होणार आहे. सुरुवातीच्या सत्रात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला किती लवकर गुंडाळतो, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. तसेच भारताला मेलबर्न कसोटी इतिहास रचण्याची संधी आहे. कारण येथे सर्वात यशस्वी पाठलाग करताना ३३२ धावा केल्या होत्या, जे इंग्लंडने १९२८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध केले होते.

हेही वाचा – IND vs AUS : नितीश रेड्डीने शतकानंतर बॅटवर का अडकवले हेल्मेट? स्वत:च केला खुलासा, कारण जाणून कराल सलाम

लायन आणि बोलंड या कांगारुच्या शेपटाने भारताचे सर्वाधिक नुकसान नुकसान केले आहे. ११० चेंडूत म्हणजेच दोघांनी मिळून सुमारे १८ षटके खेळली आहेत. दिवसाच्या शेवटच्या षटकात टीम इंडियालाही संधी मिळाली, पण बुमराहचा तो चेंडू नो बॉल होता. बुमराहचा नो बॉल लायनच्या बॅटची कडा घेऊन केएल राहुलच्या हातात विसावला होता. पण नो बॉलमुळे लायनला जीवदान मिळाले.

हेही वाचा – Virat Kohli : ‘विराट, मी तुझा बाप…’, ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राने ओलांडली निर्लज्जपणाची सीमा, भारतीय चाहत्यांचा चढला पारा

ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव –

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची फलंदाजी खराब राहिली होती. मात्र, मार्नस लबूशेनने सर्वाधिक ७० धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार पॅट कमिन्सने ४१ धावांची खेळी साकारली. याशिवाय लायन-बोलंड जोडीने डाव सावरला. ऑस्ट्रेलियाच्या पाच फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. यामध्ये सॅम कॉन्स्टास (८), ट्रॅव्हिस हेड (१), मिचेल मार्श (०), ॲलेक्स कॅरी (२) आणि मिचेल स्टार्क (५) यांचा समावेश आहे. उस्मान ख्वाजा २१ धावा करून बाद झाला तर स्टीव्ह स्मिथ १३ धावा करून बाद झाला. भारताकडून आतापर्यंत बुमराहने चार आणि सिराजने तीन विकेट्स घेतल्या आहेत. रवींद्र जडेजाला एक विकेट मिळाली.

Story img Loader