IND vs AUS Rohit Sharma Showing Angry Reaction on Rohit Sharma : मेलबर्नमधील बॉक्सिंग डे कसोटीचा चौथा दिवस संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध ३३ धावांची आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताचा युवा खेळाडू यशस्वी जैस्वालकडून खराब क्षेत्ररक्षण पाहिला मिळाले. ज्यामुळे त्याला संघातील सहकाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. सर्वात महत्त्वाच म्हणजे कर्णधार रोहित शर्मा त्याच्यावर प्रचंड चिडलेला दिसला. ज्यावर आता ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू माईक हसीने प्रतिक्रिया देताना रोहितवर टीका केली आहे.

यशस्वी जैस्वालकडून झेल सुटल्यामुळे रोहित संतप्त –

थर्ड स्लिप आणि गली कॅचर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यशस्वी जैस्वालकडून बरेच झेल सुटले. ज्यामुशे रोहित शर्माने संतप्त देहबोली दाखवली. यानंतर रोहित शर्मावर टीकेची झोड उठली आहे. यशस्वीकडून झेल सुटल्यानंतर रोहित शर्माने रागाच्या भरात हवेत ठोसे मारण्यास सुरुवात केली. विराट कोहलीही रागावलेला दिसत होता, तर आकाशदीपने यशस्वी जैस्वालला काही अपशब्द बोलले. यशस्वी जैस्वालकडून झेल सुटल्यामुळे रोहित शर्माने ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली, त्यावर ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज माईक हसीने टीका केली आहे.

Rohit Sharma Statement on India Defeat Said They fought hard with last wicket partnership cost us the game
IND vs AUS: “…त्या क्षणीच आम्ही सामना गमावला”, रोहित शर्माने सांगितलं भारताच्या पराभवाचं कारण; सामन्यानंतर मोठं वक्तव्य
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
prajakta mali reaction after suresh dhas apology
सुरेश धस यांच्या दिलगिरीनंतर प्राजक्ता माळीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, “अत्यंत मोठ्या मनाने माफी मागितल्यामुळे…”
Image of a burnt car or a police investigation scene.
Fake Death : सव्वा कोटींच्या विम्यासाठी मृतदेहाची चोरी, स्वत:च्या मृत्यूचा बनाव करणाऱ्या तरुणाचा डाव पोलिसांकडून उघड
Airtel long validity plans For One Year
Airtel Long Validity Plans : प्रत्येक महिन्याला रिचार्ज करण्याचे टेन्शन दूर! ‘हे’ पाहा एअरटेलचे वर्षभराचे तीन प्लॅन्स…
Ramesh Bhatkar
लग्नाच्या वेळी अभिनेते रमेश भाटकरांकडे होता फक्त १६ रुपये बँक बॅलन्स; मृदुला भाटकर म्हणाल्या, “प्रेम असेल तर…”
Navjot Singh Sidhu on Travis Head celebration
IND vs AUS, 4th Test: ट्रॅव्हिस हेडच्या कथित अश्लील सेलिब्रेशनवर सिद्धू संतापले; म्हणाले, “त्याला अशी शिक्षा द्या की…”
valmik karad surrendered in pune
Walmik Karad: “वाल्मिक कराडचा शेवटचा कॉल पुण्याचा होता, याचा अर्थ…”, अंजली दमानियांचा मोठा दावा; सरपंच हत्येप्रकरणी भाष्य

माईक हसी काय म्हणाला?

फॉक्स क्रिकेटवर बोलताना माईक हसी म्हणाला, ‘खरं सांगायचं तर मला भारतीय कर्णधाराची ही प्रतिक्रिया आवडली नाही. मला त्याच्या भावनांची कदर आहे आणि त्याला विकेटची नितांत गरज होती, पण तुम्हाला शांत आणि समर्थनाचा संदेश द्यावा लागेल. कारण झेल सोडण्याचा इरादा कोणाचाच नसतो. कारण झेल सुटल्यामुळे त्याला आधीच वाईट वाटले असेल. विशेष म्हणजे मार्नस लबूशेनचा झेल सुटल्यामुळे कारण चेंडू खूप वेगाने आतमध्ये येतो किंवा बाहेर जातो. त्यामुळे युवा खेळाडूबद्दल अशा प्रकारे राग व्यक्त करायला नको होता.

हेही वाचा – IND vs AUS : जसप्रीत बुमराहच्या भेदक गोंलदाजीनंतर कांगारुच्या शेपटाने भारताला फोडला घाम, घेतली मोठी आघाडी

यशस्वी जैस्वालने सोडले अनेक झेल –

यशस्वी जैस्वालने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात तिसऱ्या ओव्हरमध्ये उस्मान ख्वाजाचा दोन धावांवर स्लीपमध्ये झेल सोडला. यानंतर ४०व्या षटकात आकाशदीपच्या दुसऱ्या चेंडूवर यशस्वी जैस्वालकडून मार्नस लबूशेनचा झेल सुटला. त्यावेळी तो ४६ धावांवर फलंदाजी करत होता. यानंतर लबूशेनने या जीवनदानाचा फायदा उठवला आणि ७० धावांची खेळी साकारली. यानंतर ४९व्या षटकात यशस्वी जैस्वालकडून पॅट कमिन्सचा झेल सुटला. त्यावेळी पॅट कमिन्स २० धावांवर खेळत होता. अखेर पॅट कमिन्स ४१ धावा करुन बाद झाला

Story img Loader