IND vs AUS Mitchell Johnson Suggest Drop Marnus Labuschagne From Adelaide Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेतील दुसरा सामना ६ डिसेंबर रोजी ॲडलेड येथे खेळला जाणार आहे. दोन्ही संघातील हा सामना पिंक बॉल कसोटी (डे-नाईट) सामना असणार आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने मोठं वक्तव्य केलं आहे. त्याच्या मते खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या मार्नस लबूशेनला प्लेइंग इलेव्हनमधून वगळावे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात लबूशेनने ५२ चेंडूत दोन धावा आणि दुसऱ्या डावात पाच चेंडूत तीन धावा केल्या होत्या. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला २९५ धावांनी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे मिचेल जॉन्सनच्या मते मार्नस लॅबुशेनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देऊ नये.

लबूशेनने दुसऱ्या कसोटीत खेळू नये – जॉन्सन

मिचेल जॉन्सनने ‘नाईटली’मधील आपल्या कॉलममध्ये लिहिले आहे की, ‘मार्नस लबूशेन बऱ्याच काळापासून धावा काढण्यासाठी संघर्ष करत आहे. त्यामुळे ॲडलेडमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला मैदानात उतरवायला हवे. याचा अर्थ पहिल्या कसोटी सामन्यातील दारुण पराभवासाठी कोणाला बळीचा बकरा बनवण्यात आला, असे नाही. त्याला कसोटी संघातून बाहेर केल्याने त्याला काही शेफिल्ड शिल्ड सामने आणि क्लब क्रिकेट खेळण्याची संधी मिळेल. तसेच देशासाठी खेळण्याचे त्याच्यावर कोणतेही दडपण नसेल.’

हेही वाचा – IND vs AUS : ‘विराट कोहलीकडून या गोष्टी शिका…’, दुसऱ्या कसोटीपूर्वी स्मिथ-मार्नसला रिकी पॉन्टिंगचा महत्त्वाचा सल्ला

जॉन्सन लबूशेनबद्दल काय म्हणाला?

u

मिचेल जॉन्सन पुढे म्हणाला, ‘मला वाटते की जसप्रीत बुमराह आणि त्याच्या सहकारी गोलंदाजांचा सामना करण्याऐवजी देशांतर्गत क्रिकेट खेळल्याने लबूशेनला फायदा होईल. गेल्या १० कसोटी डावांमध्ये त्याने केवळ एकदाच दुहेरी आकडा गाठला आहे. त्याला क्रीजवर राहण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल, पण सध्या असे करुन चालणार नाही.लबूशेनला वगळण्याचा अर्थ असा नाही की त्याचे कसोटी क्रिकेटमधील भवितव्य टांगणीला लागले आहे किंवा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी तो योग्य खेळाडू नाही. स्टीव्ह स्मिथचा फॉर्म हा चिंतेचा विषय आहे. आपण ज्यासाठी ओळखतो ती चमक त्यांने गमावलेली दिसते. तो त्याच्या पॅडवर येणारे चेंडू खेळू शकत नाही, तर पूर्वी तो अशा चेंडूंवर सहज धावा काढत असे.’

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus mitchell johnson suggest drop marnus labuschagne from adelaide test due to poor form vbm