Suryakumar Yadav on Shreyas Iyer: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी खेळला गेला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने शानदार फलंदाजी करत वन डे कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावले. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने ५० षटकांत १० गडी गमावून २७६ धावा केल्या.

जर सूर्यकुमार यादवच्या खेळीबद्दल सांगायचे झाले तर त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४९ चेंडूंचा सामना करत ५० धावांची खेळी खेळली होती. ज्यामध्ये एक षटकार आणि पाच चौकारांचा समावेश होता. अनेक दिवसांपासून एकदिवसीय क्रिकेटमधील खराब कामगिरीच्या काळातून जात असलेल्या सूर्याने आपण वन डे क्रिकेटमध्ये उत्कृष्ट फलंदाज असल्याचे सिद्ध केले आहे. त्याच्या खेळीने दुखापतीतून सावरत असलेल्या श्रेयस अय्यरचे स्थान धोक्यात आले आहे. सध्या त्याच्या वाईट फॉर्ममधून जात आहे.

Team India Performance in Border Gavaskar Trophy played at Australia
Team India : टीम इंडियाची ऑस्ट्रेलियामध्ये कामगिरी खूपच निराशाजनक, तब्बल ‘इतक्या’ वेळा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत पत्करावा लागलाय पराभव
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Mumbai Indians will buy five of their old players for IPL 2025
Mumbai Indians : मुंबई इंडियन्स विक्रमी सहाव्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी ‘या’ पाच जुन्या शिलेदारांवर लावणार बोली, जाणून घ्या कोण आहेत?
AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
harris rauf celebrating wicket of glen maxwell
Pak vs Aus: भारताविरूद्धची तयारी पडली कांगारुंना भारी; पाकिस्तानने उडवला १४० धावात खुर्दा
Australia A beat India A by 6 Wickets in in 2nd unofficial Test
IND A vs AUS A : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी भारताची उडाली दाणादाण, दुसऱ्या सराव सामन्यातही हार
IND A vs AUS A India A team Ball Tempering Controversy David Warner Asks Cricket Australia Official Statement
IND vs AUSA: भारताच्या दबावामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बॉल टेम्परिंग प्रकरण गुंडाळलं; डेव्हिड वॉर्नरचं मोठं वक्तव्य

ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंसाठी महत्त्वाची मानली जात आहे. विश्वचषकापूर्वी पहिल्या दोन सामन्यांमध्ये वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवने या संधीचा फायदा घेत पहिल्या सामन्यात दमदार खेळी करत संघाच्या विजयाचा हिरो ठरला. त्याला बाहेर बसण्याचे कारण म्हणजे फलंदाज फ्लॉप झाला.

ऑस्ट्रेलिया मालिकेमुळे भारतीय संघातील काही खेळाडूंना विश्वचषकापूर्वी स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये इशान किशनने संधीचा फायदा घेत प्लेइंग इलेव्हनमध्ये आपले स्थान पक्के केले. असाच काहीसा प्रकार आता सूर्यकुमार यादवच्या बाबतीत झाला. एकदिवसीय संघातील खराब कामगिरीमुळे टीकेचा सामना करणाऱ्या या फलंदाजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेतील पहिल्या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला. या खेळीमुळे बरेच काही बदलू शकते.

हेही वाचा: IND vs AUS: “आप एसी में थे, मैं गर्मी में था”, पाच विकेट्स घेतल्यानंतर मोहम्मद शमी असं का म्हणाला? जाणून घ्या

सूर्यकुमारचे नशीब बदलेल का?

गेल्या काही सामन्यांमध्ये कसोटी असो वा वन डे, सूर्यकुमार यादवला एका खेळाडूमुळे बाहेर बसावे लागले, तो म्हणजे श्रेयस अय्यर. श्रेयस अय्यरला दुखापत झाल्याने सूर्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले. एकदिवसीय मालिकेत अय्यरच्या अनुपस्थित सूर्यकुमार यादव खेळायला आला. आता दोघांचाही समावेश ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या प्लेईंग-११ मध्ये करण्यात आला होता. त्या सामन्यात जिथे श्रेयस फ्लॉप ठरला आणि सूर्याने अर्धशतक केले. यामुळे श्रेयस अय्यरचे स्थान धोक्यात आले आहे. जर आगामी दोन वन डे सामन्यात मोठी खेळी करू शकला नाही तर त्याला विश्वचषक संघातून देखील वगळले जाऊ शकते.

हेही वाचा: IND vs AUS: अक्षर पटेलची दुखापत किती गंभीर? टीम इंडिया अष्टपैलूच्या शोधात, सामन्यानंतर अश्विनचा स्पेशल Video व्हायरल

भारताने सामना जिंकला

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली. यादरम्यान प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत १० गडी गमावून २७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने हा सामना पाच विकेट्स राखून जिंकला. आता या विजयासह भारतीय संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.