ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुनरागमन केलेल्या महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. सिडनी वन-डे सामन्यात एक धाव काढत धोनीने हा विक्रम केला आहे, याआधी विंडीजविरुद्ध झालेल्या मालिकेत धोनीला हा विक्रम करण्याची संधी आली होती, मात्र तिकडे तो अपयशी ठरला होता.

धोनीच्या नावावर १० हजार १७३* धावा आहेत, परंतु यापैकी केवळ ९९९९ धावा या भारताकडूनच्या आहेत. उर्वरित धावा त्याने आशिया एकादश संघाचे प्रतिनिधित्व करताना केल्या आहेत. त्याने आशिया एकादश संघाचे प्रतिनिधित्व करताना २००७ मध्ये आफ्रिका एकादश संघाविरुद्ध १७४ धावा केल्या होत्या.

भारताकडून वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –

सचिन तेंडुलकर (४६३ सामने) – १८ हजार ४२६ धावा

सौरव गांगुली (३०८ सामने) – ११ हजार २२१ धावा

राहुल द्रविड (३४० सामने) – १० हजार ७६८ धावा

विराट कोहली (२१६ सामने) – १० हजार २३२ धावा

Story img Loader