भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात टीम इंडियाने बाजी मारत ४ विकेट्सने पराभव केला. यासह भारताने टॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. सामन्यादरम्यान अनेक व्हीडिओ, फोटो व्हायरल होत असतात. भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात एक चाहतीचा व्हीडिओ व्हायरल झाली आहे. आता ही मिस्ट्री गर्ल कोण आहे, अशी चर्चा सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यादरम्यान कॅमेरामनने एका सुंदर मुलीला कॅमेऱ्यात कैद केले. काही मिनिटांतच या मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आणि चाहते सामन्यादरम्यान ट्विट करत ही मिस्ट्री गर्ल कोण हे विचारत होते. भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान कॅमेरामॅनने देखील अनेकदा या मिस्ट्री गर्लवर कॅमेरा फोकस केला होता.

उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान ही मुलगी अनेकदा दिसली. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये ही मुलगी तिच्या मोबाईलमध्ये सामन्याचे फोटो,व्हीडिओ टिपताना दिसत आहे. तेव्हाच कॅमेरामनही कॅमेरामध्ये तिला टिपतो. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये बसून चॅम्पियन्स ट्रॉफी सेमीफायनल मॅच पाहणारी ही मुलगी पायल धरे आहे.

पायल सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे आणि तिच्या सौंदर्याची अनेकदा चर्चा होते. तिचे “पायल गेमिंग” नावाचे गेमिंग यूट्यूब चॅनल देखील आहे. त्या चॅनलवर ४ दशलक्षाहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. पायल इंस्टाग्रामवर देखील खूप प्रसिद्ध आहे आणि तिचे इंस्टाग्रामवर सुमारे ३.८ मिलियन फॉलोअर्स आहेत.

चाहत्याने पायल गेमिंगचा फोटो शेअर करत लिहिले की, बाकी सर्व ठीक आहे पण कोण आहे ही व्हायरल मुलगी जिला कॅमेरामन सारखा का कॅमेरा टिपत आहे. ही व अशा अनेक पोस्ट चाहत्यांनी केल्या आहेत.

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान असलेल्या या मिस्ट्री गर्लचे नाव पायल धरे आहे. पायल धरेदेखील फॅशन सेन्समध्ये खूप कमाल आहे आणि तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अनेक फोटो पोस्ट केले आहेत ज्यात तिच्या फॅशन सेन्स आणि ड्रेसिंग सेन्स पाहता येतो.

पायल धरेच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर भारतीय क्रिकेटर रोहित शर्माबरोबरचा एक फोटोही आहे. रोहित शर्मा आणि पायल धरे यांचा हा फोटो आयपीएल २०२४ मधील आहे. रोहित शर्माशिवाय पायलचा रितिका सजदेहबरोबरचाही एक फोटो आहे. पायल धरेला क्रिकेटची खूप आवड आहे आणि तिचे भारतीय जर्सी आणि स्टेडियम दरम्यानचे अनेक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आहेत.