Nitish Reddy Family Meets Him After Maiden Test Hundred: भारताचा युवा स्टार खेळाडू नितीश रेड्डीने शतकासह भातीय संघाला तारलं आहे. नितीशने मेलबर्न कसोटीत टीम इंडियाला सर्वाधिक गरज असताना महत्त्वपूर्ण खेळी करत शतक झळकावले आहे. नितीश रेड्डीचं शतक भारतासाठी खूप महत्त्वाचं ठरलं. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने ९ बाद ३५८ धावा केल्या आहेत. भारतीय संघ अद्याप ११६ धावा मागे आहे पण नितीश रेड्डी आणि मोहम्मद सिराजची जोडी चौथ्या दिवसाचा खेळ सुरू करेल. नितीशच्या शतकानंतर त्याला भेटण्यासाठी त्याचे आई- वडिल हॉटेलमध्ये गेले असतानाचा व्हीडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४७४ धावा केल्या होत्या, यानंतर फलंदाजीला उतरलेल्या भारताची सुरूवात पुन्हा एकदा खराब झाली. दुसऱ्या दिवसाच्या अखेरपर्यंत भारताने ५ विकेट्स गमावले होते. यानंतर तिसऱ्या दिवशी पंत आणि जडेजाने बाद झाल्यानंतर भारत मोठ्या पेचात सापडला होता पण नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदरने भारतासाठी १२७ धावांची भागीदारी करत महत्त्वपूर्ण कामगिरी केली. वॉशिंग्टन सुंदरनेही अर्धशतक झळकावत नितीशला चांगली साथ दिली.

हेही वाचा – IND vs AUS: “हे शतक तुमच्यासाठी..”, नितीश रेड्डीची शतकानंतर वडिलांसाठी भावुक पोस्ट, सिराजसाठी लिहिलं खास कॅप्शन

नितीश रेड्डीचे पहिले आंतरराष्ट्रीय शतक पाहून त्याचे वडिल मुत्याल्या रेड्डी भावुक झाले होते. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू येत असतानाचा आणि देवाचे आभार मानतानाचे फोटो आणि व्हीडिओ व्हायरल झाले आहेत. नितीशच्या शतकानंतर त्याचे कुटुंबीय आई, वडिल, बहिण आणि काका त्याला भेटण्यासाठी टीम हॉटेलमध्ये गेले.

हेही वाचा – IND vs AUS: “मी टेन्शनमध्ये होतो, पण सिराजने…”, नितीश रेड्डीच्या वडिलांची लेकाच्या शतकावर पहिली प्रतिक्रिया, सिराजचा उल्लेख करत काय म्हणाले?

हेही वाचा – IND vs AUS: नितीश रेड्डीचं पहिलं कसोटी शतक! ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर एकटा उभा ठाकला; वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू

हॉटेलमध्ये त्याच्या रूमची बेल वाजताच त्याने दरवाजा उघडला आणि बाहेर कुटुंबीयांना पाहून त्याने एक मोठी स्माईल दिली. लेकाला पाहताच त्याची आई पुढे सरसावली आणि त्याचा मुका घेत त्यच कौतुक केलं. बहिणीनेही त्याची भेट घेत त्याचा अभिमान असल्याचे सांगितले. तर शेवटी एका बाजूला उभं राहिलेल्या त्याच्या वडिलांनी त्याची भेट घेतली. लेकाच्या कुशीत शिरून त्याचे वडिल रडले आणि त्यांना पाहून नितीशही भावुक झाला. नितीशच्या कुटुंबाच्या भेटीचा हा व्हीडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. नितीशच्या वडिलांनी शेवटी भारतीय क्रिकेट संघाचेही आभार मानले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus nitish reddy family meets him in team hotel after maiden test hundred bcci shares video bdg