अंधुक प्रकाश आणि पावसाच्या व्यत्ययामुळे सिडनी कसोटी सामना अनिर्णित राहिला. वरुणराजाच्या कृपेमुळे ऑस्ट्रेलियाने आपला पराभव टाळला, मात्र भारताने याआधीच दोन कसोटी सामने जिंकल्यामुळे मालिकेतला आपला पराभव टाळणं ऑस्ट्रेलियाला जमलं नाही. ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने भारतीय संघाचं विजयाबद्दल कौतुक केलं, मात्र स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यासारखे अनुभवी खेळाडू संघात नसल्यामुळे आमच्या संघाची अशी गत झाल्याचं म्हणत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला होता. ऑस्ट्रेलियन कर्णधाराचा हा प्रयत्न भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी हाणून पाडला आहे. स्मिथ-वॉर्नर ऑस्ट्रेलियन संघात नसणं ही भारताची चूक नसल्याचं गावसकर यांनी म्हटलं आहे.

“स्मिथ-वॉर्नर हे ऑस्ट्रेलियन संघात नाहीत यात भारतीय संघाची चूक नाहीये. क्रिकेट ऑस्ट्रेलिया या दोन्ही खेळांडूवर कमी महिन्यांची बंदी घालू शकली असती. मात्र बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर या खेळाडूंवर एक वर्षाची बंदी घालणं क्रिकेट बोर्डाला योग्य वाटलं. प्रत्येक बाबतीमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला मात दिली आहे, त्यामुळे त्यांनी केलेल्या कामगिरीचं कौतुक व्हायलाचं हवं.” Sony Sports वाहिनीवर गावसकर बोलत होते.

अवश्य वाचा – IND vs AUS : भारतीय संघ आमच्यापेक्षा सरस, ऑस्ट्रेलियन कर्णधाराने केला पराभव मान्य

Story img Loader