KL Rahul Sloppy Wicketkeeping: भारत आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी के.एल. राहुलला कर्णधार बनवण्यात आले आहे. कर्णधारपदाबरोबरच राहुल विकेटकीपिंगही करत आहे, पण या सामन्यात अशा अनेक घटना घडल्या ज्यामुळे चाहते के.एल. राहुलवर नाराज आहेत आणि त्याला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत.
के.एल. राहुलच्या चुकीमुळे अश्विनला विकेट मिळाली
के.एल. राहुलच्या हातातून आज अनेकदा चेंडू निसटला. मात्र, राहुलच्या चुकीचा फायदाही भारतीय संघाला झाला. अश्विन ३२व्या षटकात गोलंदाजी करत असताना पहिली संधी आली, जेव्हा चौथ्या चेंडू के.एल. राहुलच्या हातातून निसटला आणि स्टंपला लागला. यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लाबुशेनला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. अशीच आणखी एक संधी ३९व्या षटकात घडली जेव्हा मोहम्मद शमीने ओव्हरचा तिसरा चेंडू टाकला आणि विकेटच्या मागे उभ्या असलेल्या के.एल. राहुलच्या हातातून चेंडू निसटला, पण याचाही फायदा भारतीय संघाला झाला. यानंतर खेळपट्टीवर उपस्थित ऑस्ट्रेलियन फलंदाज जोस इंग्लिस आणि कॅमेरून ग्रीन धावा घेण्याचा प्रयत्न करत असताना कॅमेरून ग्रीन धावबाद झाला.
भारतीय चाहत्यांनी ट्वीटरवर के.एल. राहुलवर खूप मीम्स केले
आता, काही यूजरकर्ते के.एल. राहुलच्या खराब विकेटकीपिंगवर नाराज आहेत. एका यूजरकर्त्याने, ट्वीटरवर के.एल. राहुलच्या विकेटकीपिंगवर उपरोधिक टीका केली. त्याने लिहिले, “के.एल. राहुल मी बाहेर पडत नाही, पण चेंडूच बाहेर पडत आहे.” दुसऱ्या एकाने लिहिले – “यार, काय माणूस आहे, तो चूक करतोय, तरीही त्याच चुकीमुळे विरोधी संघाचे फलंदाज बाद होत आहेत. आता आणखी काय बोलता येईल?” तिसऱ्या एका यूजरने लिहिले की, “भाई नींद में खेलता है क्या?” यावेळी काहीना ऋषभ पंत, इशान किशन आणि एम.एस. धोनीची आठवण आली. “संजू सॅमसन टीम मध्ये नाही आणि धोनीनंतर भारत अजूनही चांगल्या विकेटकीपरच्या शोधात आहे,” असेही एका यूजरने म्हटले.
ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २७७ धावांचे आव्हान ठेवले आहे
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वन डे सामना शुक्रवारी (२२ सप्टेंबर) मोहालीमध्ये खेळला जात आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्याच सामन्यात मोहम्मद शमी याने आपली गुणवत्ता दाखवून दिली. शमीने आज भारतासाठी सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघ ५० षटकांमध्ये टीम इंडियासमोर २७७ धावांचे आव्हान ठेवले आहे.
ऑस्ट्रेलियासाठी या सामन्यात सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने सर्वाधिक ५२ धावांची खेळी केली. वॉर्नरव्यतिरिक्त स्टीव स्मिथ (४१), मार्नस लाबुशेन (३९) आणि जोस इग्लिस (४५) यांनी महत्वापूर्ण खेळी केली. पण संघातील दुसरा एकही फलंदाज अर्धशतक किंवा शतक करू शकला नाही. भारतासाठी मोहम्मद शमी याने १० षटकांमध्ये ५१ धावा खर्च करून सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह यालाही १० षटकात ४३ धावा खर्च केल्यानंतर एक विकेट मिळाली. फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.