भारताचा स्थायी कर्णधार हार्दिक पांड्याने गुरुवारी सांगितले की, दुखापतग्रस्त श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीमुळे या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या भारताच्या तयारीवर परिणाम होईल. पाठीच्या दुखापतीमुळे अय्यर शुक्रवारपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे आणि तो केव्हा पुनरागमन करू शकेल याबद्दल निश्चित कालमर्यादा नाही. इंडियन प्रीमियर लीगच्या सुरुवातीच्या सामन्यांमधूनही तो बाहेर जाण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हार्दिक पुढे म्हणाला, “अशी कोणतीही दीर्घकालीन योजना नाही. जस्सी (बुमराह) गेल्या काही काळापासून संघासोबत नाही. आमचा गोलंदाज गट चांगला खेळत आहे. ते सर्व आता अनुभवी आहेत. जस्सी असल्‍याने मोठा फरक पडतो पण खरे सांगायचे तर आम्‍हाला याची फारशी चिंता नाही कारण ज्या खेळाडूंनी जस्‍सीची भूमिका घेतली आहे, ते चांगले करतील याची मला खात्री आहे.”

भारत पहिल्या वनडेत नियमित कर्णधार रोहित शर्माशिवाय खेळणार आहे जो कौटुंबिक करणामुळे बाहेर पडला आहे. त्याच्या अनुपस्थितीत इशान किशन आणि शुबमन गिल डावाची सुरुवात करतील, पांड्या म्हणाला, “साहजिकच त्याच्या पुनरागमनासाठी कोणतीही कालमर्यादा नाही, परंतु आम्ही सर्वोत्तम कामगिरीची आशा करतो,” असे पांड्याने पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी बोलताना सांगितले. “आम्ही श्रेयस आणि बुमराह लवकर बरे व्हावे अशी शुभेच्छा देतो.”

पांड्या म्हणाला, “त्याच्या (अय्यर) अनुपस्थितीचा परिणाम होईल आणि नक्कीच आम्हाला त्याची उणीव भासेल पण जर तो लवकर परत आला नाही तर आम्हाला यावर उपाय शोधावा लागेल.” आगामी काळात तो संघात खेळणार असेल तर स्वागतार्ह आहे पण तो नसेल तर आपल्याला पुढे कसे जायचे आहे याचा विचार करायला बराच वेळ आहे.” भारताच्या जखमी खेळाडूंच्या यादीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचाही समावेश आहे, ज्याच्या पाठीवर नुकतीच न्यूझीलंडमध्ये शस्त्रक्रिया झाली आहे. विश्वचषकापर्यंत पुनरागमन करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे, तो म्हणाला, “इशान आणि शुबमन डावाची सुरुवात करतील. वर्षभर खेळपट्टी सारखीच दिसते. मी येथे जवळपास सात वर्षे खेळत आहे. खेळपट्टीमुळे दोन्ही संघांना समान संधी मिळणार असल्याने ते आव्हानात्मक असेल.”

हेही वाचा: Suresh Raina: “मी शाहिद आफ्रिदी नाही…” सुरेश रैनाने पाकिस्तानी माजी खेळाडूला मारला टोमणा, Video व्हायरल

टीम इंडियामध्ये कोणाला संधी मिळणार?

अशा प्रकारे, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांच्या रूपात तीन योग्य वेगवान गोलंदाज आहेत, कर्णधार हार्दिक पांड्या देखील गरज पडल्यास मध्यमगती करू शकतो. म्हणजे एकूण चार वेगवान गोलंदाज, यानंतर कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा फिरकी विभागाची धुरा सांभाळू शकतात. आठव्या क्रमांकापर्यंत भारताकडे एकूण सहा गोलंदाज आणि फलंदाजी असेल. ऑस्ट्रेलियन संघाने कसोटी मालिका गमावल्यामुळे त्यांना वनडे मालिकेची सुरुवात चांगली करायची आहे. त्यामुळे त्यांना हलक्यात घेता येणार नाही. हा सामना मुंबईत होणार आहे, जिथे खेळपट्ट्या अनेकदा फिरकीपटूंना अनुकूल असतात. प्लेइंग इलेव्हनचा कर्णधार हार्दिक पांड्या कोणत्या सोबत मैदानात उतरतो आणि कसोटीनंतर वनडेमध्ये संघाची कामगिरी कशी होते हे पाहावे लागेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus odi hardik pandya ends the kishan vs rahul debate who will be the opener for the first odi against australia avw