ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने भारताविरुद्ध कसोटी मालिकेत पराभव मान्य केला आहे. संपूर्ण मालिकेत भारतीय संघ आमच्यापेक्षा सरस होता, शेवटच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघ ज्या पद्धतीने खेळला त्यामुळे आम्ही बॅकफूटवर ढकललो गेलो. भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार होता अशा शब्दांत टीम पेनने आपला पराभव मान्य केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“परदेशात जाऊन कसोटी सामने जिंकणं किती कठीण काम असतं याची मला कल्पना आहे. त्यामुळे भारतीय संघाने केलेल्या कामगिरीचं नक्कीच कौतुक करायला हवं. या विजयासाठी भारतीय संघाने घेतलेली मेहनत पूर्णपणे मैदानामध्ये दिसून आली.” टीम पेन सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होता. स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या अनुपस्थितीत खेळणारा ऑस्ट्रेलियन संघ दुबळा मानला जात होता. मात्र पर्थ कसोटी सामन्यात भारतावर मात करुन ऑस्ट्रेलियाने भारताला चांगली टक्कर दिली होती.

अवश्य वाचा – भारताची तपश्चर्या फळाला, कांगारुंच्या भूमीत भारताने कसोटी मालिका जिंकली

4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-1 च्या फरकाने बाजी मारली. भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाच्या भूमीतला हा पहिलाच विजय ठरला आहे. यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियात 3 वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. दौऱ्याच्या सुरुवातीस 3 टी-20 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत सुटली होती. त्यामुळे वन-डे मालिकेत कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : विराट भारताचा सर्वोत्तम कर्णधार होऊ शकतो – सुनिल गावसकर