IND vs AUS Pat Cummins Reaction: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात टीम इंडियावर कांगारू भारी पडताना दिसत आहेत. विश्वचषक फायनलच्या पूर्वसंध्येला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने आपल्याकडून याच पद्धतीचा खेळ खेळला जाणार असल्याची पूर्वकल्पना दिली होती. “भारतात सामना असल्याने स्टेडियममध्ये भारतीय चाहतेच जास्त असणार आहेत. अंदाजे १ लाख ३० हजार लोक भारताचा जयघोष करत असतील याची आम्हाला कल्पना आहे पण हे आम्ही स्वीकारलं आहे. आणि खरंतर अशा एकतर्फी सामन्यातच स्टेडियममधील फॅन्सना शांत करण्याची गंमत काही औरच असते.” अशा आशयाची प्रतिक्रिया पॅट कमिन्सने दिली होती.

कमिन्स म्हणाला की, “इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळल्यानंतर, पाचवेळा चॅम्पियन असलेला ऑस्ट्रेलिया संघ भारतीयांच्या क्रिकेटप्रेमाला ओळखून आहे. मोठ्या गर्दीसमोर खेळणे ही सध्याच्या ऑस्ट्रेलियन संघातील अनेकांसाठी नवी गोष्ट नाही. स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि ग्लेन मॅक्सवेल हे सर्व २०१५ च्या फायनलमध्ये होते. तेव्हा ऑस्ट्रेलियाने ८० हजारहून अधिक चाहत्यांसमोर MCG येथे न्यूझीलंडचा पराभव केला होता. संघातील बरेच जण आयपीएलही खेळले आहेत.”

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
He should focus on his batting and not hairstyle Adam Gilchrist slams Shubman Gill his failures
Shubman Gill : ‘हेअरस्टाइलवर नव्हे तर फलंदाजीवर लक्ष दे…’, अ‍ॅडम गिलख्रिस्टने ‘या’ भारतीय फलंदाजाला फटकारले
Cricket Australia Breaks Silence on Not Inviting Sunil Gavaskar For Border Gavaskar Trophy Presentation
IND vs AUS: सुनील गावस्करांचा अपमान केल्याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं मोठं वक्तव्य, आपली चूक केली मान्य; नेमकं काय घडलं?
Sunil Gavaskar Big Statement on Team India Test Series Defeat Against Australia Rohit Sharma IND vs AUS bdg 99
IND vs AUS: “आम्ही कोण? आम्हाला क्रिकेट थोडंच येतं…”, सुनील गावस्कर भारताच्या मालिका पराभवानंतर रोहित शर्मावर संतापले?
IND vs AUS Who is Beau Webster Debutante who hit the winning four for Australia in his Sydney test in BGT 2025
IND vs AUS : पदार्पणात अर्धशतक अन् विजयी चौकार! कोण आहे ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ब्यू वेबस्टर? सिडनी कसोटीत भारतासाठी ठरला डोकेदुखी
Sunil Gavaskar upset that he was Not called to hand over Border Gavaskar Trophy to Australia IND vs AUS
IND vs AUS: सुनील गावस्करांचा ऑस्ट्रेलियात अपमान? नाराजी व्यक्त करत म्हणाले, “मी भारतीय आहे म्हणून…”
IND vs AUS You can not fight your body Jasprit Bumrah breaks silence on his back injury after Sydney test
IND vs AUS : ‘तुम्ही तुमच्या शरीराशी …’, पराभवानंतर दुखापतीबद्दल बोलताना जसप्रीत बुमराहने व्यक्त केली खंत

ऑस्ट्रेलियाच्या संघाच्या तयारीविषयी बोलताना पॅट कमिन्स म्हणाला होता की, “एक गोष्ट जी सातत्यपूर्ण राहिली ती म्हणजे संघाचं मनोबल. सर्वच आशावादी आहेत. प्रत्येक जण खेळासाठी तयार आहे. हा सामना आमच्या सर्वांच्याच करिअरसाठी महत्त्वाचा ठरू शकतो, जेव्हा मागे वळून आजच्या सामन्याकडे पाहू तेव्हा अभिमान वाटू शकतो. नेदरलँड्सविरुद्ध, सामना वगळल्यास आम्हाला कोणतेही मोठे विजय मिळालेले नाहीत. आम्हाला विजय गवसताना खूप अडचणी आल्या पण विजयी कसे व्हायचे हे आम्ही ओळखले आहे. प्रत्येक विजयासाठी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळा खेळाडू संघासाठी उत्तम कामगिरी करताना दिसला आहे.

हे ही वाचा<< IND vs AUS: “तुझं फक्त एकच काम..”, माजी स्टार खेळाडूची अभिषेक बच्चनसाठी पोस्ट, लोक म्हणतात, “चुकूनही..”

दरम्यान, सहा आठवड्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाने भारत आणि दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करून विश्वचषक मोहिमेची सुरुवात केली तेव्हा यंदाच्या विश्वचषकात कांगारूंचा कितपत निभाव लागू शकेल याविषयी शंका होती. त्यात अनेक खेळाडूंना झालेल्या दुखापती ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढवण्याची शक्यता वाटत होती. दुसरीकडे, भारतीय संघ विश्वचषकातील आतापर्यंतचा एकमेव अपराजित संघ ठरला आहे. पण आजच्या सामन्याकडून पॅट कमिन्सच्या अपेक्षा वेगळ्या होत्या. आजचा सामना जिंकून सहाव्यांदा ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देणे हे त्याच्या करिअरच्या महत्त्वाचे असल्याचे त्याने पत्रकार परिषदेत सांगितले होते.

Story img Loader