IND vs AUS Fan Invades on Ground Hugs Virat Kohli: भारत-ऑस्ट्रेलिया मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी मोठी धावसंख्या रचत मजबूत स्थितीत आला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ सध्याच्या घडीला ५०० धावांचा आकडा गाठू पाहत आहे. पण तत्त्पूर्वी दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच एक चाहता थेट मैदानाक घुसला आणि विराट-रोहितची भेट घेण्यासाठी गेला. त्याने विराट कोहलीला मिठी मारण्याचा प्रयत्न केला पण तितक्यात सुरक्षारक्षकांनी त्याला पकडत मैदानाबाहेर नेले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रादरम्यान मेलबर्न क्रिकेट मैदानावर (MCG) सुरक्षेत मोठी त्रुटी दिसली. सुरक्षा कर्मचाऱ्यांना चकमा देत एक प्रेक्षक मैदानात घुसण्यात यशस्वी झाला. सर्वात आधी तो रोहित शर्माजवळ गेला आणि मग विराट कोहलीला मिठी मारण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा – IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात नेमकं काय घडलं? उस्मान ख्वाजाने सांगितला प्रसंग

विराट कोहली स्लिपमध्ये उभा असताना ही घटना घडली. एक प्रेक्षक धावत मैदानात गेला आणि प्रथम रोहित शर्माच्या दिशेने गेला, परंतु सुरक्षा कर्मचाऱ्यांना चकमा देत कोहलीपर्यंत पोहोचला. कोहलीच्या खांद्यावर हात टाकलेला त्याचा फोटो व्हायरल होत आहे. मैदानात घुसल्यानंतर हा चाहता डान्स करतानाही दिसला. मात्र सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला लगेच पकडून मैदानाबाहेर नेले. या प्रकरणामुळे सामना काही वेळ थांबवण्यात आला.

मैदानात उतरलेल्या चाहत्याच्या टी-शर्टवर FREE असे लिहिले होते. तो मैदानात विराट कोहलीच्या खांद्यावर हात ठेवून मैदानात काही सेकंद चालतानाही दिसला. यानंतर त्याने विराटच्या खांद्यावरून हात काढला आणि अचानक डान्स करू लागला आणि तितक्यात विराट बाजूला झाला आणि पुढे निघून गेला.

हेही वाचा – IND vs AUS: भारतीय संघ मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या दिवशी हातावर काळी पट्टी बांधून का उतरला? काय आहे नेमकं कारण

मेलबर्न क्रिकेट मैदानामध्ये प्रेक्षकांनी कोहलीविरूद्ध वारंवार नारेबाजी केली. कदाचित पहिल्या दिवशी मैदानावर ऑस्ट्रेलियन पदार्पणवीर सॅम कोन्स्टासबरोबर झालेल्या धक्काबुक्कीमुळे चाहते नाराजी दर्शवताना दिसले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) या घटनेबद्दल कोहलीला त्याच्या मॅच फीच्या २० टक्के दंड ठोठावला आणि त्याला एक डिमेरिट पॉइंट्सही दिला आहे.

हेही वाचा – IND vs AUS: स्टिव्ह स्मिथचं ऐतिहासिक कसोटी शतक, भारताविरूद्ध ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज

यासह ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात फलंदाजी करताना ४७४ धावा केल्या आहेत. स्टिव्ह स्मिथचं शतक आणि टॉप ऑर्डरच्या फलंदाजीच्या जोरावर संघाने मोठी धावसंख्या उभारली आहे. प्रत्युत्तरात भारताने सुरूवातीच्या षटकांमध्ये फॉर्ममध्ये नसलेल्या रोहित शर्माची स्वस्तात विकेट गमावली. सध्या मैदानावर राहुल आणि यशस्वीची जोडी आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus pitch invader at the mcg tried to hug virat kohli and dances on ground in melbourne test watch video bdg