IND vs AUS Prasidh Krishna clean bowled Alex Carey Video Viral : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पाचवा कसोटी सामना सिडनीत खेळला जात आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फंलंदाजावर वर्चस्व गाजवले. कर्णधार जसप्रीत बुमराहने तर भेदक गोलंदाजी केलीच, पण त्याला प्रसिध कृष्णाने चांगली साथ दिली. त्याने ॲलेक्स कॅरीचा त्रिफळा उडवत ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का दिला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
प्रसिध कृष्णाने उडवला ॲलेक्स कॅरीचा त्रिफळा –
ऑस्ट्रेलिया संघाला १३७ धावांवर सहावा धक्का बसला. हा धक्का भारतासाठी खूप कालावधीनंतर कमबॅक करणाऱ्या वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने दिला. त्याने अप्रतिम गोलंदाजी करताना पहिल्यांदा स्टीव्ह स्मिथला (३३) बाद केले. त्यानंतर सहाव्या विकेट्सच्या रुपाने ॲलेक्स कॅरी त्रिफळा उडवला. विशेष म्हणजे प्रसिध कृष्णाने ॲलेक्स कॅरीची मधली स्टंप उडवली. ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. सध्या कर्णधार पॅट कमिन्स आणि ब्यू वेबस्टर क्रीजवर आहेत. ऑस्ट्रेलिया अजूनही भारताच्या धावसंख्येक्षा ४८ धावांनी मागे आहे.
तत्पूर्वी दुसऱ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात पाच गडी गमावून १०१ धावा केल्या होत्या. सध्या ब्यू वेबस्टर २८ धावांवर नाबाद असून ॲलेक्स कॅरी चार धावांवर नाबाद आहे. भारताने पहिल्या डावात १८५ धावा केल्या होत्या. या बाबतीत ऑस्ट्रेलियन संघ अजूनही ८४ धावांनी मागे आहे. आज ऑस्ट्रेलियाने एका विकेटवर नऊ धावांवर खेळण्यास सुरुवात केली आणि ९२ धावा करताना चार विकेट गमावल्या.
u
शुक्रवारीच उस्मान ख्वाजा दोन धावा करून बुमराहचा बळी ठरला. यानंतर आज बुमराहने मार्नस लबूशेनला यष्टिरक्षक पंतकरवी झेलबाद केले. त्याला दोन धावा करता आल्या. तेव्हा सिराजचा कहर दिसला. त्याने डावाच्या १२व्या षटकात सॅम कॉन्स्टास आणि ट्रॅव्हिस हेडला बाद केले. कॉन्टासला २३ तर हेडला चार धावा करता आल्या. यानंतर प्रसिध कृष्णाने स्टीव्हन स्मिथला राहुलकरवी झेलबाद केले. त्याला ३३ धावा करता आल्या.